Nashik BJP AB form clash News Update 
महाराष्ट्र

Municipal Election : नाशिकमध्ये महाभारत! भाजपमध्ये उमेदवारांची फरफट, एबी फॉर्मसाठी आमदारांच्या कारचा पाठलाग, सिनेस्टाईल राड्याचा घटनाक्रम

Municipal Corporations Election : नाशिकमध्ये भाजपच्या एबी फॉर्म वाटपावरून मोठा गोंधळ उडाला. आमदारांच्या गाडीचा पाठलाग, गेट तोडून प्रवेश आणि पोलिस हस्तक्षेपामुळे नाशिकमधील हा राडा राज्यभर चर्चेत आला.

Namdeo Kumbhar

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Nashik BJP AB form clash News Update : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना राज्यत अनेक ठिकाणी राडा पाहायला मिळाला. भाजप, शिंदेसेना, ठाकरेसेना अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांचा रोष जनतेसमोर आला. मुंबई, पुण्यापासून संभाजीनगर अन् नाशिक, नागपूरमध्ये नाराज नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पण नाशिकमध्ये वेगळेच महाभारत पाहायला मिळाले. एबी फॉर्मच्या पळवापळवीमुळे नाशिकची चर्चा राज्यात सुरू झाली. ३ आमदारांच्या कारचा एबी फॉर्मसाठी पाठलाग केल्याचा व्हिडिओ समोर आला.

नाशिकमध्ये आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी AB फॉर्मच्या पळवापळवीवरून भाजपमध्ये सिनेस्टाईल राडा पाहायला मिळाला. मुंबई नाशिक महामार्गावर AB फॉर्म असलेली गाडी भाजप आमदार सीमा हिरे यांनी अडवली. आणि त्यानंतर AB फॉर्म असलेल्या गाडीचा पाठलाग इच्छुक उमेदवारांनी सुरू केला होता. भाजपचे तिन्ही आमदार आणि शहराध्यक्ष सुनील केदार AB फॉर्म असलेल्या गाडीत बसलेले होते. AB फॉर्म असलेल्या गाडीत भाजप आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष सुनील केदार आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा देखील होते. तर इच्छूक उमेदवार त्या गाडीच्या मागे पाठलाग करत होते. अखेर काही वेळाच्या सिनेस्टाईल पाठलागानंतर महामार्गावरील एका खासगी फार्महाऊसवर AB फॉर्म असलेली गाडी आणि तिन्ही आमदार आत शिरले.

मात्र आक्रमक झालेल्या भाजपमधील निष्ठावंत इच्छुक उमेदवार थेट गेट तोडून आतमध्ये घुसले. त्यानंतर आतमध्ये पुन्हा चांगलाच राडा झाला. गेली अनेक वर्षे भाजपमध्ये निष्ठेने काम करूनही उमेदवारी मिळत नसल्याने इच्छुक उमेदवारांनी भाजप आमदारांसमोर चांगलाच गोंधळ घातला आणि राडा घातला. या सगळ्या प्रकाराचा जाहीर निषेध व्यक्त करत निष्ठावंतांनी भाजप नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

पाहा घटनाक्रम -

१२.०० वाजता मुंबई-नाशिक महामार्गावरील एका फॉर्म हाऊसमध्ये AB फॉर्मच वाटप सुरू असलेल्या ठिकाणी इच्छुक उमेदवार भिडले

१२.३५ वाजता AB फॉर्म घेऊन भाजपचे आमदार राहुल ढिकले आणि शहराध्यक्ष सुनील केदार एका गाडीतून बाहेर पडले

१२.५० वाजता आमदार सीमा हिरे आणि इच्छूक उमेदवारांनी मुंबई नाशिक महामार्गावर AB फॉर्म असलेली गाडी अडवली आणि सीमा हिरे AB फॉर्म असलेल्या गाडीत बसल्या

१२.५० ते १.०५ मिनिटांपर्यंत महामार्गावर AB फॉर्मच्या गाडीचा पाठलाग आणि पळवापळवीचा थरार सुरू होता

१.०५ मिनिटांनी AB फॉर्म असलेली गाडी आणि आमदार पुन्हा महामार्गावरील खासगी फॉर्म हाऊसवर पोहचले

१.१० मिनिटांनी आक्रमक कार्यकर्त्यांनी गेट तोडून आत प्रवेश केला आणि पुन्हा एकदा राडा झाला

१.३० वाजता पोलिस अधिकारी फॉर्म हाऊसवर पोहचले

२.०० वाजता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक फॉर्म हाऊसवर पोहचले

२.१५ वाजता मंत्री गिरीश महाजन फॉर्म हाऊसवर पोहचले.

राड्यानंतर गोपनीय पद्धतीनं उरलेल्या उमेदवारांना एक एक करून AB फॉर्मचे वाटप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महायुती कोल्हापूरकरांना कसा विश्वास देणार? सतेज पाटील यांचा सवाल

Alcohol Fact: दारु प्यायल्यावर अनेकांना जुनी नाती का आठवतात? कारण वाचून व्हाल थक्क

Maharashtra Politics: पुण्यात भाजपला धक्का; चंद्रकांतदादांना नडलेला मोहरा राष्ट्रवादीला गावला, बड्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ

तिकीट कापलं, ठाकरे सेनेविरोधात संताप; मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांचा राडा, VIDEO

Indigo आणि Air India मध्ये पायलटसाठी भरती; नुसता बोनसच ५० लाखांचा, तरीही तरीही वैमानिकांची ऑउटगोइंग सुरूच

SCROLL FOR NEXT