संजय सूर्यवंशी, नांदेड साम प्रतिनिधी
Pravin Darekar on Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जहरी टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना फक्त राजकीय पोळी भाजपायची होती. त्यासाठी त्यांनी मराठा समाजाचा वापर केला, असा आरोप दरेकर यांनी केला. ते नांदेडमध्ये बोलत होते.
मराठा आरक्षण हा विषय आता बाजूला राहिलेला आहे. ते (मनोज जरांगे) पूर्णपणे राजकीय झालेले आहेत, राजकीय नेत्याला लाजवेल अशी भाषा त्यांचा तोंडी येत आहे. याचाच अर्थ आता ते पूर्णपणे राजकीय झालेले आहेत, मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या दृष्टीने प्राधान्य राहिलेला नाहीये. त्यांना जी राजकीय पोळी भाजायची होती. त्यांनी मराठा समाजाचा वापर करून घेतलेला आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
महाराष्ट्राचं नेतृत्व करतील याचा अर्थ कर्जत जामखेडमध्ये ते असणार नाहीत, कर्जत जामखेडची जनता विचार करील, महाराष्ट्रात काम करायचं असेल तर कर्जत जामखेड कोण बघणार? त्यामुळे कर्जत जामखेडची जनता त्यांना महाराष्ट्रात जाऊ देणार नाही. त्यामुळे नेतृत्व करायचा प्रश्नच येत नाही. ज्यांना आमचीच काळजी नाही यांना मतदारसंघाची काळजी नाही, निवडूनच कशाला द्या असा विचार तेथील जनता करेल, असा टोला दरेकर यांनी लगावला.
तालीम आता सुरू झालेली आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय विधान जो तो आपल्या पक्षाचा उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करीत असतो, मला वाटतं बच्चू भाऊंनी दमानं घेतलं पाहिजे. जुळवा जुळव सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा गणपती करायला पहिलं बच्चू कडू त्यांनी गणपती तयार करण्याची माती मजबूत केली पाहिजे. मी बोल घेवडे म्हणून राहाल आणि मुख्यमंत्री तुमचा कधी काय करतील याचा पत्ता लागणार नाही, असे दरेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, त्या प्रकारचे चित्र निर्माण झालेला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा सुसंवाद राहिलेला नाहीये. आमचा अजून जागा वाटपाचा, नेतृत्वाचा, यावरून त्यांची तिथं मारामारी सुरू आहे. मागची पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व दिले आणि आताचे अडीच वर्षे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व दिलं. आणि राज्य एका प्रगतीकडे सुरू आहे. अनेक नेते आमच्याकडे येऊ शकतात असा दावा भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.