BJP Saam TV
महाराष्ट्र

BJP News : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 97% आमदारांची तिकीटं कापणार? भाजपचा मेगाप्लान तयार

भाजपने सरपंचापासून आमदारांपर्यंत सर्वांचं सोशल मीडिया ऑडिट सुरू केले आहे

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : भाजपने आगामी विधानसभा निवडणूक २०२४ची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजपचे मुख्य लक्ष्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणार असल्याचं कळतंय. म्हणजेच पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंतचे विद्यमान प्रतिनिधी सोशल मीडिया प्लॅटफार्मवर किती अॅक्टिव्ह आहेत, यावर त्यांची पुढील उमेदवारी निश्चित होईल.

या दृष्टीने भाजपने सरपंचापासून आमदारांपर्यंत सोशल मीडिया ऑडिट सुरू केले आहे. या ऑडिटनुसार विद्यमान १३ टक्के आमदार सोशल मीडियावर पूर्णपणे निष्क्रिय आहेत, तर ९७ टक्के आमदारांचे फॉलोअर्स २५ हजारांपेक्षा कमी आहेत, त्यामुळे त्यांचे विधानसभेचे तिकीट धोक्यात आल्याची माहिती आहे.

भाजपते 104 आमदार, 25 खासदारांसह सुमारे 2800 लोकप्रतिनिधींचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. 104 पैकी 13 टक्के आमदार सोशल मीडियावर पूर्ण निष्क्रिय, तर 97% आमदारांचे फॉलोअर्स 25 हजारांच्या आत आहेत. 70 टक्के खासदार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. 25 हजारांपेक्षा कमी फॉलोअर्स असलेल्या आमदारांमध्ये ग्रामीण भागातील आमदार जास्त आहेत. त्यांची लोकांशी नाळ असली तरी सोशल मीडियाच्या बाबतीत ते अजूनही मागे आहेत.

मात्र 2024 च्या निवडणुकीत सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने ही योजना आखली आहे. अनेकजण सोशल मीडियावर कायम काहीतरी पाहत असतात. एखाद्याने एका विषयाची पोस्ट पाहिली की त्याच प्रकारच्या पोस्ट त्याला येत राहतात. याचा आधार भाजप घेणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींपासून भाजपच्या सोशल मीडिया हँडलपर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी भाजपचे १९ हजार जण सोशल मीडिया वॉरियर म्हणून पक्षाशी जोडले जातील. त्यांच्या मदतीने हे आव्हान पेलण्याचे उद्दिष्ट आहे. (Latest Marathi News)

आज 18 वर्षांच्या मतदाराने फक्त मोदींचे राज्य पाहिले आहे. काँग्रेसचा सत्ताकाळ त्यांना माहिती नाही. हा वर्ग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याने उपयोग करून घेतला जाणार आहे. दुसरं म्हणजे भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य घराघरात पोहोचवायचे आहे. त्यासाठी सोशल मीडियावर अधिक भर दिला जातोय, असं भाजप प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT