bison 
महाराष्ट्र

सांगलीकरांनी साेडला सुटकेचा नि:श्वास; गवा नैसर्गिक अधिवासात

सांगली मार्केट यार्ड परिसरात जमावबंदीचा आदेश तहसीलदार डी.एस. कुंभार यांनी काढला हाेता.

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या मार्केट यार्डात घुसलेल्या गव्यास पकडल्यानंतर आज (बुधवार) सकाळच्या सुमारास त्यास नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले आहे. या गव्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यास काेणताही त्रास नसल्याची खात्री झाल्याने वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडल्याची माहिती दिली.

सांगली (sangli) शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास गवा (bison) घुसला हाेता. हा गवा सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घुसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले हाेते. त्याच गुळाचे सौदे हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे साधारणतः दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली हाेती.

हा गवा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने तहसीलदारांनी शहरात जमावबंदीचा आदेश लागू केला हाेता. या गव्यास पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तसेच सह्याद्री व्याघ्र (sayhadri tiger reserve) प्रकल्पाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले हाेते.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ताईला मानलं राव...भल्या मोठ्या नागाला पकडण्यासाठी केली कसरत; VIDEO पाहून मनात भरेल धडकी

US Presidential Election Result: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत १९८ मतं; कमला हॅरीस यांना किती मतं?

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

SCROLL FOR NEXT