Kass  
महाराष्ट्र

पर्यटकांनाे! कास पुष्प पठारात गव्यांचा कळप दिसल्यास 'हे' करा

ओंकार कदम

सातारा : जागतिक वारसास्थळ म्हणून दर्जा लाभलेल्या प्रसिद्ध अशा कास पुष्प पठारावर kass valley of flowers निसर्गाने फुलांची केलेली मुक्तहस्ताने उधळण पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत आहेत. परंतु आता पर्यटकांनी येथे काळजी घेणे गरजेचे बनले आहे. या पुष्प पठारा लगतच काही पर्यटकांनी मोठ्या संख्येने गव्यांचा कळप मुक्त संचार करत असल्याचा व्हिडिओ चित्रित केला आहे. हा व्हिडिओ सध्या अनेकांच्या माेबाईलवर धडकू लागला आहे.

हे पुष्प पठार पाहण्यासाठी आणि येथील परिसरातील निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी व रविवारी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. या पुष्प पठारास नुकतीच पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनीही कुटुंबियांसह भेट दिली हाेती.

या भागात पर्यटनाचा आनंद लुटताना अनेकजण छायाचित्र काढत असतात. या परिसरात फिरताना काही पर्यटकांना नुकताच गव्यांचा कळप दिसला. या पर्यटकांनी कळपाचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल हाेत आहे.

हे गवे रानगवे आहेत. ते समोर आले तर त्यांना कोणीही हुसकावून लावण्याचा, दगड मारण्याचा प्रयत्न करु नये. त्यांना त्यांच्या मार्गाने पुढे जाऊ द्यावे. ते तेथून शांतपणे निघून जातात असे एका ग्रामस्थाने सांगितले. दरम्यान या गव्यांना त्रास दिल्यास ते तुमच्यावर हल्ला करु शकतात असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे कास पुष्प पठार किंवा परिसरात गवे दिसल्यास पर्यटकांनी स्वतःबराेबर त्यांना त्रास हाेऊ नये असे वर्तुणक करावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Safe Dating Tips: डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या व्यक्तीसोबत डेटला जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT