sangli, islampur saam tv
महाराष्ट्र

Buffalo Birthday : बर्थडे आहे रेड्याचा...दीड टन वजन, ५० लाख किंमत; 'गजेंद्र'च्या वाढदिवसाची तुफान चर्चा

गजेंद्र हा कुतूहलाचा विषय झाल्याने त्याला पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनात गर्दी हाेत आहे.

विजय पाटील

सांगली (sangli) जिल्ह्यातील इस्लामपुरात (islampur) दीड टन वजनाच्या रेड्याचा (domestic water buffalo) पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाची चर्चा सांगली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर आज इस्लामपुर येथे भरलेल्या शिवार कृषी प्रदर्शनात गजेंद्र नावाचा रेडा पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. (Maharashtra News)

मंगसूली येथील विलास नाईक यांचा गजेंद्र नावाचा रेडा पाच वर्षाचा झाला आहे. त्याचा शुक्रवारी माेठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. गजेंद्र हा दीड टन वजनाचा आहे. त्याची किंमत पन्नास लाख रुपये इतकी आहे.

सध्या तो इस्लामपूर येथे सुरू असलेल्या शिवार कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरला आहे. प्रदर्शनाचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी या प्रदर्शनात त्याचा वाढ दिवस साजरा केला.

यावेळी महिलांनी त्याला ओवाळले. अगदी एखाद्या घराच्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करावा असा तसा वाढदिवस गजेंद्र रेड्याच्या साजरा झाला. पन्नास लाखाच्या या रेड्याच्या वाढदिवसाची चर्चा सांगली (sangli) जिल्ह्यात रंगली आहे. गजेंद्र हा कुतूहलाचा विषय झाल्याने त्याला पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनात (Islampur Krushi Pradarshan) गर्दी हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT