Beed Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident : ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, 1 जागीच ठार; बीडच्या सोमठाना गावाजवळील घटना

भरधाव ट्रकनेने दुचाकीस्वरास चिरडल्याची धक्कादायक घटना बीडच्या सोमठाना गावाजवळ घडली आहे.

विनोद जिरे

Beed Accident News : भरधाव ट्रकनेने दुचाकीस्वरास चिरडल्याची धक्कादायक घटना बीडच्या सोमठाना गावाजवळ घडली आहे. पाथरीहून -माजलगावच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वाराला, कारखान्याची माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. ही घटना मंगळवारी सायं ६ वाजता सोमठाना येथे घडली.

या भीषण अपघातात (Accident) एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील नागेश पोईनकर वय 34 हा पाथरी तालुक्यातील मानोली येथे कार्यक्रमासाठी गेला होता. तो पाथरीहून माजलगावकडे दुचाकी वरून येत होता.

या दरम्यान सोमठाना गावाजवळ आला असता, समोरून येणाऱ्या भरघाव वेगातील ट्रकने दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील नागेश पोईनकर याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. दरम्यान या घटनेने हळहळ व्यक्त केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT