Udaysinh Vilasrao Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता अजित पवार गटात करणार प्रवेश

Udaysinh Vilasrao Patil: साताऱ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. काँग्रेसचा बडा नेता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

संभाजी थोरात, सातारा

महाराष्ट्रातल्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेते मंडळी महायुतमधील अनेक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर जोरदार सुरू आहे. अशामध्ये आता साताऱ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. काँग्रेसचा बडा नेता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अ‍ॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर हे लवकरच काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत अशी माहिती समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. उदयसिंह पाटील हे कॉग्रेसचे जेष्ठ नेते स्वर्गीय माजीमंत्री विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत.

उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चेमुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी निवडक प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता अनेक कार्यकर्त्यांनी लवकरच पक्षप्रवेश करावा अशी मते मांडली होती. प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर यांच्यात चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. उदयसिंह पाटील उंडाळकरांच्या पक्षप्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादी आणखी मजबूत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT