Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

पालघरमध्ये मोठी राजकीय घडामोड! एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बड्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Deputy CM Eknath Shinde: पालघरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या बड्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला.

Priya More

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये भाजपकडून मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटालाच मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विधानसभेचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडली. प्रकाश निकम यांनी आज मोखाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रकाश निकम यांच्यासोबत युवासेना जिल्हाप्रमुख रिकी रत्नाकर यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतले.

तसंच, प्रकाश निकम यांच्यासोबत जव्हार मोखाड्यातील अनेक बडे नेते, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी भाजपचे कमळ हाती घेतले. मुंबईमध्ये या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षाशीच गद्दारी करणाऱ्या निलेश सांबरे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने प्रकाश निकम नाराज असल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा शिंदेंना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीला भाजपच्या रविंद्र चव्हाणांनी मोठा धक्का दिला. पालघरमधील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक नंदकुमार पाटील, अपक्ष माजी नगरसेवक प्रवीण मोरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य कलाकार दळवी आणि पौर्णिमा धोंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

गरोदरपणात महिलांचं किती वजन वाढणं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT