rahul shewale, Shivsena Ekanath Shinde, MP Bhavana Gavali
rahul shewale, Shivsena Ekanath Shinde, MP Bhavana Gavali Saam TV
महाराष्ट्र

मोठी बातमी! राहुल शेवाळेंच्या गटनेतेपदी नियुक्तीला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट सुरूच आहे. त्यातच खरी शिवसेना नेमकी कुणाची यावरून वाद सुरू आहे. दरम्यान, आता राज्यानंतर केंद्रातही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे एक दोन नव्हे तर तब्बल 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहे. इतकंच नाही तर या 12 खासदाराच्या गटनेतेपती राहूल शेवाळे यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. (Ekanath Shinde News)

लोकसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या गटनेतेपती राहूल शेवाळे तसंच मुख्य प्रतोदपती भावना गळी यांना मान्यता दिली आहे. मंगळवारी या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. भेटीमध्ये नवीन गटनेत्याच्या नियुक्तीबाबत पत्र दिलं होतं. दरम्यान, आता या 12 खासदारांची मागणी लोकसभा अध्यक्षांनी मान्य केल्याची माहिती आहे.

त्यामुळे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते आता राहुल शेवाळे राहणार असून प्रतोद म्हणून भावना गवळी कायम राहणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेच्या 12 खासदारांनी देखील आपण शिंदे गटात सामील होत असल्याची घोषणा केली. दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली. (Rahul Shevale Latest News)

महत्वाची बाब म्हणजे आपण अजूनही एनडीएचा भाग असल्याचं या 12 खासदारांनी म्हटलं. त्यातच आता शिवसेनेच्या लोकसभेतील एकनाथ शिंदे गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिरवा कंदील दिला आहे. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बसलेला सर्वात मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulmohar Mahotsav : साताऱ्यात १ मे रोजी साजरा केला जातोय गुलमोहर दिन; महोत्सवात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

Health Tips: रात्रीच्या जोवणामध्ये कारलं खाल्याने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Shrikant Shinde News | श्रीकांत शिंदेंसाठी राज ठाकरे सभा घेणार का? शिवतिर्थावर खलबतं

Today's Marathi News Live : वर्ध्यातील वादळात मुळासकट संत्राची झाडे जमीनदोस्त

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

SCROLL FOR NEXT