Jarange-Patil Calls Off Hunger Strike Saam Tv
महाराष्ट्र

Jarange-Patil Hunger Strike: मोठी बातमी! जरांगे पाटील यांनी उपोषण घेतलं मागे, मात्र सरकारसमोर ठेवली 'ही' अट

Jarange-Patil Calls Off Hunger Strike: मोठी बातमी! जरांगे पाटील यांनी उपोषण घेतलं मागे, मात्र सरकारसमोर ठेवली 'ही' अट

Satish Kengar

Jarange-Patil Calls Off Hunger Strike:

एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण मागं घेतलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाच्या हस्ते साखपणी घेत उपोषण मागे घेतलं आहे.

या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे यांच्यसह इतर महत्वाच्या नेत्यांचाही समवेश होता. जरांगे यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी आणखी मुद्दत दिली आहे. मात्र त्यांनी एकच अट ठेवली आहे की, 'मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या.' तसेच सर्व आंदोलन आता बंद करा, असं आवाहन जरांगे यांनी राज्यभरातील मराठा आंदोलकांना केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'वेळ घ्या, मात्र आरक्षण द्या'

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला. मात्र मनोज जरांगे पाटील हे 24 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यास ठाम होते. यानंतर सरकारी शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर त्यांनी आरक्षण देण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ दिली आहे. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले आहेत की, 'वेळ घ्या, मात्र आरक्षण द्या.'  (Latest Marathi News)

आपल्याला लढाई जिंकायची आहे, ती जिकणार. मी मराठ्यांचा अपमान होऊ देणार नाही. सरकारला वेळ द्यायची का, असं त्यांनी यावेळी आंदोलकांना विचारलं. यानंतर उपस्थित सर्व आंदोलकांनी एक सुरत याला होणार दिला. यानंतर आपण आंदोलन स्थगित करत असल्याचं जरांगे म्हणाले.

दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. याबाबत त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी सकाळी उपोषण सुरूच राहणार, तसेच आरक्षण मिळाल्यानंतरच घरी जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT