कोरोना काळात मराठी कलाकार, लोक कलावंत, नाट्यकर्मी यांचे मोठे नुकसान - मातोंडकर  विकास काटे
महाराष्ट्र

कोरोना काळात मराठी कलाकार, लोक कलावंत, नाट्यकर्मी यांचे मोठे नुकसान - मातोंडकर

कोरोना काळात मराठी कलाकार,लोक कलावंत,नाट्यकर्मी यांचं मोठं नुकसान झालं असुन अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एक कलाकार म्हणुन हि खुप मोठी शोकांतिका वाटते असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : कोरोना काळात मराठी कलाकार,लोक कलावंत,नाट्यकर्मी यांचं मोठं नुकसान झालं असुन अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एक कलाकार म्हणुन हि खुप मोठी शोकांतिका आहे. मला पण वाटत नाट्यगृह आणि चित्रपटगृह लवकरात लवकर सुरु व्हावे मात्र कोरोना काळात बंद खोलीत एकत्रित येण धोक्याचे असल्याने ते अद्यापही सुरु करण्यासाठी वेळ लागतोय, पण लवकरच ते देखील सुरु करण्याचा निर्णय येणार असल्याचे अभिनेत्री आणि शिवसेना महिला उपनेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले.

हे देखील पहा -

ठाण्यात विहंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आयोजित मंगळा गौर कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर या उपस्थित झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी लोकनृत्यावर ठेका धरला यावेळी शिवसेना नगरसेविका परिषा सरनाईक या देखील होत्या. आदिवासी नृत्यावर ठेका धरल्यानंतर उपस्थितांसाठी त्यांनी यावेळी लावणीच्या दोन ओळी देखील गाऊन सर्वांची मन जिंकली.

यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना चित्रपट गृह, नाट्यगृह अद्यापही बंद असल्याबाबत विचारले असता एक कलाकार म्हणुन माझ्यासाठी खुप मोठी शोकांतिका आहे. मात्र लवकरात लवकर ते देखील सुरु होईल, असे मातोंडकर यांनी सांगितले तसेच संस्कृती, लोककला, पारंपरिक कला टिकून राहावी यासाठी राज्य शासन नवीन योजना आणण्याच्या प्रयत्नात आहे आणि मी त्या समितीवर आहे म्हणुन लवकरच प्रयत्न केले जाणार असल्याचे मातोंडकर यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑगस्टला

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

मोठी बातमी! 24 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्षांना मृत्यूदंडाची शिक्षा; जगभरात खळबळ

SCROLL FOR NEXT