महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे फडणवीस सरकार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत उपाययोजना करत आहेत. अशातच सरकारने आणखी एक मोठी महत्वाची योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकांच्या पाणीपुरवठा व मलनिःसारणासाठीची सहायक अनुदान योजना सरकारने बंद केली. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून नगरपालिकांसाठीची सहायक अनुदान योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.
Rationalization of Scheme म्हणजेच योजनांच्या सुसूत्रीकरणांतर्गत हा निर्णय आहे. नगरपालिकांच्या पाणीपुरवठा व मलनिःसारण योजनांसाठीच्या सहायक अनुदानाचे लेखाशीर्ष 2215 8973 बंद करण्यास शासनाने मान्यता दिली. शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व मलनिःसारण योजनांसाठी समान उद्देशाच्या दोन स्वतंत्र अनुदान योजना कार्यरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरी भागातील पाणीपुरवठा व मलनिःसारणाची कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून अमृत आणि नगरोत्थान महाअभियानांतर्गत हाताळली जातात. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व मलनिःसारण योजनांसाठी लेखाशीर्ष 2215 A014 अंतर्गत स्वतंत्र अनुदान योजना सुरूच राहणार आहे. योजनांची पुनरावृत्ती टाळणे आणि उपलब्ध निधीचा अपेक्षित परिणाम साधणे हा योजनांच्या सुसूत्रीकरणामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीतील नगरपालिकांसाठीची संबंधित सहायक अनुदान योजना बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.