Sangli News Today: सांगली शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाऱ्या सुरेश आणि दिनेश पारेख बंधू, अरविंद आणि ऋषिकेश लढ्ढा या चार बड्या व्यापाऱ्यांसह पिंटू बियाणी या व्यापाऱ्यावर काल ईडीच्या पथकांनी छापे टाकून तपासणी केली. आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. ११ वाहनांमधून ६० अधिकारी या कारवाईसाठी सांगलीत दाखल झाले होते. या पथकासोबत आलेल्या सीआरपीएफच्या जवानांचा बंगल्यासमोर बंदोबस्त ठेवण्यात आला.(Latest Marathi News)
यावेळी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. शहरातील शासकीय रुग्णालयामागे त्रिकोणी बागेसमोर दिनेश पारेख आणि सुरेश पारेख या व्यापारी भावांचे शेजारीशेजारी बंगले आहेत. दोघेही इलेक्ट्रिक साहित्याचे मोठे व्यापारी आहेत. दोघांच्या घरांवर काल (२३ जून) सकाळी ७ वाजता छापा टाकण्यात आला.
त्यानंतर काही वेळात न्यू प्राइड मल्टिप्लेक्स शेजारच्या व्यंकटेशनगरातील अरविंद आणि ऋषिकेश लढ्ढा या इलेक्ट्रिक साहित्याच्या व्यापाऱ्यांच्या घरांवरही ईडीच्या पथकांचे छापे टाकले. यासोबतच पिंटू बियाणी या व्यापाऱ्यांच्या घरावरही ईडीच्या (ED) पथकांचे छापे टाकले. (Sangli News)
पारेख यांचा गणपती पेठेत, पटेल चौकात इलेक्ट्रिकलचा मोठा व्यवसाय आहे. ईडीच्या अधिकाऱ्यानी घराची झडती घेवून महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते तसेच त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणीही छापा घालून तेथूनही महत्त्वाची कागदपत्रे, माहिती घेतली असल्याचे समजते.
या पाच व्यापाऱ्याकडे चौकशी करताना ईडीने व्यापाऱ्याची खाती असलेल्या बँकेत देखील जाऊन चौकशी केली आहे. यामध्ये पेठ येथील राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने या व्यापाऱ्यांच्या खात्याबाबाबत चौकशी केल्याचे समोर आले आहे. रात्री अडीच वाजता ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटपून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, पारेख यांच्यावर यापूर्वीही आर्थिक अनियमितते प्रकरणी जीएसटी, व्हॅट, कस्टम्स विभागाच्या कारवाई झाल्या आहेत. आता ईडीची कारवाई झाली आहे. आजच्या कारवाईचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून ही कारवाई झाल्याचे समजते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.