Maharashtra government approves four major expressway projects to strengthen connectivity across Vidarbha region. saam tv
महाराष्ट्र

Vidarbha Expressway : मोठी बातमी! विदर्भात ४ महामार्ग होणार, कुठून कोणता एक्सप्रेस वे जाणार? वाचा A टू Z माहिती

Vidarbha expressway project Update News : विदर्भातील ४ नवीन द्रुतगती महामार्गांना राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

new expressways approved in Vidarbha Maharashtra : विदर्भाच्या कानाकोपऱ्यात रस्त्याचे जाळे तयार करण्यासाठी राज्य सरकारने ४ महामार्गाला मंजूरी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत ५५० किलोमीटर लांबीच्या चार नवीन द्रुतगती महामार्गांना हिरवा कंदील दाखवला आहे. डिसेंबर २०२८ पर्यंत हे महामार्ग तयार करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. या ४ महामार्गांमुळे विदर्भाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे.

कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा हे जिल्हे एकमेकांशी हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीने जोडले जातील. यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. गडचिरोलीतील कोनसारी आणि सुरजागड यांसारख्या दुर्गम भागात रस्ते पोहचल्याने येथील लोहखनिज आणि इतर उद्योगांना मोठी चालना मिळेल. हे सर्व मार्ग विदर्भातील प्रमुख केंद्रांना समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे काम करतील, ज्यामुळे विदर्भातील कृषी उत्पन्न थेट मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलद गतीने पोहोचू शकेल.

४ महामार्गाची नेमकी वैशिष्ट्य काय?

नागपूर – गोंदिया द्रुतगती मार्ग –

  • एकूण लांबी - १६२.३७७ कि.मी.

  • प्रारंभ व शेवटचा बिंदू – गवसी मानपूर, नागपूर ते सावरी, गोंदिया

  • लेनची संख्या – ३+३

  • इंटर चेंज - ९

  • आवश्यक भूसंपादन – १६३४.२७ हे.

  • हा महामार्ग नागपूर, भंडारा व गोंदिया या तीन जिल्ह्यांना जोडला जाणार

भंडारा- गडचिरोली द्रुतगती मार्ग

  • एकूण लांबी - ९४.२४१ कि.मी.

  • प्रारंभ व शेवटचा बिंदू – बोरगाव, जि. भंडारा ते ऋणमोचन, जि. चंद्रपूर

  • लेनची संख्या – ३+३

  • इंटर चेंज - ६

  • आवश्यक भूसंपादन – ११८५.७३ हे.

  • हा महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोली या तीन जिल्ह्यांना जोडला जाणार

नागपूर-चंद्रपूर द्रुतगती मार्ग

  • एकूण लांबी – २०४.७९९ कि.मी.

  • प्रारंभ व शेवटचा बिंदू – सेलडोह, जि. वर्धा ते नवेगाव मोरे (घाटकुळ),जि. चंद्रपूर

  • लेनची संख्या – २+२

  • इंटर चेंज - ७

  • आवश्यक भूसंपादन – २१५९.०८७ हे.

  • हा महामार्ग नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील ९ तालुक्यांना जोडला जाणार आहे.

नवेगाव मोरे- कोनसारी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता

  • एकूण लांबी – ८५.७६५ कि.मी

  • प्रारंभ व शेवटचा बिंदू – नवेगाव मोरे (घाटकुळ), जि. चंद्रपूर ते मंगेर, जि. गडचिरोली

  • लेनची संख्या – २+२

  • आवश्यक भूसंपादन – २८९.०२ हे.

  • हा महामार्ग चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ४ तालुक्यांना जोडला जाणार आहे.

नागपूर – गोंदिया प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग, भंडारा गडचिरोली द्रुतगती मार्ग, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती मार्ग आणि नवेगाव मोरे- कोनसारी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता या प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. या चारही प्रकल्पांची स्थापत्य किंमत ३२४७८ कोटी व एकूण बांधकाम किंमत ५१९०६.३५ कोटी रुपये एवढी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गांचे काम केले जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे पूर्व व पश्चिम क्षेत्र जोडणारे आणि विदर्भातील विकासात महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या या प्रकल्पांची पुढील कार्यवाही जलदगतीने करून प्रकल्प वेळेत होईल यावर भर द्यावा. नवेगाव मोर ते सुरजागड हा मार्ग खनिज वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

भारतात पेट्रोल-डिझेल कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोन डाॅक्टर गजाआड

Malai Kofta Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट मलाई कोफ्ता, वाचा सोपी रेसिपी

PM Modi : ६ दिवस, ५ देश... पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना

SCROLL FOR NEXT