Big blow to Uddhav Thackeray and Shinde group Shiv Sena workers resign for Maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan: शिंदे गटापाठोपाठ ठाकरे गटालाही मोठा धक्का; मराठा आरक्षणासाठी ३६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Maratha Aarakshan News: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या केजमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ३६ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

Satish Daud

Maratha Aarakshan Latest Marathi News

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच नांदेडमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. हदगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आपण हे पद स्विकारणार नाही. तसेच साखळी उपोषणाला आमचा पाठिंबा आहे, असं पत्रही त्यांनी शिवसेना सचिवांना दिलं आहे. शिंदे गटाला (Eknath Shinde) बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे बीडमध्ये ठाकरे गटाला देखील मोठा धक्का बसला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या केजमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ३६ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. केजचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) आपल्या पदाचे राजीनामे देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले होते.

त्यानंतर थोरात यांच्यासह इतर ३६ पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुकाप्रमुख शाखाप्रमुख आणि सर्कल प्रमुख यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अन्यथा गावात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना दिला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी देखील आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेतली असून अनेक ठिकाणी राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहेत. अजित पवार गटातील काही आमदारांनी सुद्धा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रियंका गांधी येणार कोल्हापुरात

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT