Sharad Pawar and uddhav thackeray File photo  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे गटासह राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी खासदार अन् आमदाराच्या मुली करणार भाजपात प्रवेश

Nashik Political News : राज्यातलं सत्तांतर आणि भाजपाची वाढती ताकद हे प्रत्येक पक्षासमोरचं मोठं आव्हान आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nashik Politics : राज्यातलं सत्तांतर आणि भाजपाची वाढती ताकद हे प्रत्येक पक्षासमोरचं मोठं आव्हान आहे. त्यानंतर आता राज्यातल्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हे नाव पवारांशीच संबंधित आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे (NCP) दिवंगत नेते वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अमृता पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आज त्या मुंबईत भाजपात प्रवेश करतील. अमृता पवार या जिल्हा परिषद सदस्य तसेच राष्ट्रवादीचे दिवंगत नेते माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या आहेत.

अमृतापवार या नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि महिला नेत्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक चेहरा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत निफाड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकिट न मिळाल्याने अमृता पवार नाराज होत्या. पक्षाचं तिकिट मिळावं म्हणून लॉबिंग करूनही अमृता पवार यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्या भाजपात जाण्याच्या चर्चा होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

तनुजा घोलप यांचा भाजपमध्ये प्रवेश

तर दुसरीकडे, बबन घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप या देखील भाजपमध्ये प्रवेश करणर आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने बसला धक्का शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बबन घोलप हे शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावान नेते आहेत. तीस वर्षे आमदार तसेच माजी मंत्री राहिलेले आहे.

भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत तनुजा घोलप आज भाजपमध्ये प्रवेश करणर आहे. तनुजा घोलप या देवळाली मतदार संघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आज दुपारी भाजपाच्या प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत त्या पक्ष प्रवेश करणार आहे.

तनुजा घोलप यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते भाजपा प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी तनुजा घोलप या शिंदे गटात जाणार अशी देखील चर्चा होती. मात्र तनुजा घोलप यांच्या भाजप प्रवेशाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flesh-Eating Screwworm: अमेरिकेत मांस खाणाऱी माशी? नरभक्षक माशी संपवणार माणूस?

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

डोळ्यांना इजा, एक मुलगा कायमची अंधत्व; कार्बाईड गनचा कहर

Raireshwar Fort: भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर दारू पार्टी; मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT