Maharashtra local body elections. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Kailas Gorantyal and Suresh Warpudkar News : काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपूडकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश मंगळवारी दुपारी ३ वाजता मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Ganesh Kavade

  • काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपूडकर भाजपमध्ये प्रवेश करणार.

  • भाजपकडून स्थानिक निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु.

  • मराठवाड्यातील नांदेड व परभणी जिल्ह्यांतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल.

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात इनकमिंग वाढले आहे.

Kailas Gorantyal and Suresh Warpudkar shift to BJP before civic polls : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये कैलास गोरंट्याल आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे. स्थानिक स्वराज्य स्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला मोठं भगदाड पडलेय. (Maharashtra local body elections)

मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत आहे. तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश मंगळवारी दुपारी ३ वाजता मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे समजतेय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी भाजपकडून मराठवाड्यामध्ये संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेस, ठाकरेंच्या दिग्गज नेत्यांना गळाला लावले जातेय. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. कैलास गोरंट्याल आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड राजकारणात घडत असलेली ही मोठी घडामोड मानली जातेय. विधानसभा निवडणुकीत मविला जोरदार धक्का बसल्यानंतर महायुतीमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढले. सर्वाधिक फटका ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसला बसला आहे. मराठवाड्यात भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले असून आपली ताकद वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT