Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: जागा वाटपावरुन महायुतीत कलह, आघाडीतही बिघाडी? ठाकरे गटाच्या दाव्याला शरद पवार गट, काँग्रेसचे आव्हान; वाचा सविस्तर...

Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी अजित पवार गटाने नरहरी झिरवळ यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर शिंदे गटाने आव्हान दिले होते. त्यानंतर आता मविआमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटातही नाशिकच्या जागेवरुन वाद पेटला आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. २ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून जागा वाटपावरुन महायुती तसेच महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने नरहरी झिरवळ यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने आव्हान दिले होते. त्यानंतर आता मविआमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटातही नाशिकच्या जागेवरुन वाद पेटला आहे. काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर...

जागा वाटपावरुन आघाडीत बिघाडी?

नाशिकमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरुन महायुतीनंतर महाविकास आघाडीमध्येही वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटप झालेले नसताना ठाकरे गटाकडून नाशिक मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाचा ठराव करण्यात आला. यावरुनच शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे.

ठाकरेंचा दावा; राष्ट्रवादी, काँग्रेसचे आव्हान!

ठाकरे गटाकडून नाशिक मध्य आणि पश्चिमच्या उमेदवारांचे नाव एक मतांनी ठरवण्यात आले, त्यांना शुभेच्छा असा खोचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी लगावला आहे. दुसरीकडे नाशिक मध्यची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे, असा ठराव झाल्याचे काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी म्हटले आहे.

महायुतीमध्येही जागा वाटपावरुन कलह!

महायुतीमध्येही जागा वाटपावरुन कलह सुरू झाला आहे. माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वकृती शर्मा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शर्मा यांना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असतानाच भाजपने या जागेवर दावा केला आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी ही जागा भाजपचे मुरजी पटेल लढवणार असल्याचे सांगितले आहे.

दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी दिंडोरीमधून नरहरी झिरवळ यांना पुन्हा उमेदवारी देण्याची घोषणा केली. यावर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी नाराजी व्यक्त करत शिंदेंनी मला शब्द दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात जागा वाटपावरुन महायुतीत वाद रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : जुन्नरच्या डोंगररांगांतील अभेद्य किल्ला, 'हे' ठिकाण जपतंय ऐतिहासिक ठेवा

Surat Bus Accident: सुरतमध्ये भीषण अपघात, दोन बस समोरासमोर धडकल्या; धडकेनंतर बसने घेतला पेट, ८ जणांचा जागीच मृत्यू

Best Exercises: डॉक्टरांनी सुचवले डायबेटीस, BP आणि हार्ट पेशंटसाठी 5 सर्वोत्तम व्यायाम

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; मुरूम-तुगाव परिसर झोडपला

भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT