'लाडकी बहीण'चा फटका! CM शिंदेंच्या दौऱ्यामुळे पोलीस भरती रद्द, तरुणांचा मनस्ताप, अंबादास दानवे संतापले
Ambadas Danave On Cm Eknath ShindeSaam Tv

Police Recruitment Cancelled: 'लाडकी बहीण'चा फटका! CM शिंदेंच्या दौऱ्यामुळे पोलीस भरती रद्द, तरुणांचा मनस्ताप, अंबादास दानवे संतापले

Chhatrapati Sambhajinagar News: मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचा पोलीस भरती करणाऱ्या तरुणांना फटका बसला असून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी आजची पोलीस भरती रद्द केली आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर, ता. २ ऑगस्ट २०२४

राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा सिल्लोडमध्ये शुभारंभ होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचा पोलीस भरती करणाऱ्या तरुणांना फटका बसला असून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी आजची पोलीस भरती रद्द केली आहे.

 'लाडकी बहीण'चा फटका! CM शिंदेंच्या दौऱ्यामुळे पोलीस भरती रद्द, तरुणांचा मनस्ताप, अंबादास दानवे संतापले
Maharashtra Politics : मोठी बातमी! शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस; नेमकं कारण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा आज सिल्लोडमध्ये शुभारंभ होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी आजची पोलीस भरती रद्द केली आहे. आज जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांची शहरातील विभागीय क्रीडा संकुलावर शारीरिक चाचणी घेण्यात येणार होती. त्यासाठी राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून परीक्षार्थी पोलीस भरतीसाठी तरुण संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते.

मात्र अचानक ज्या ठिकाणी शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे, त्या विभागीय क्रीडा संकुलाच्या समोर पोलिसांच्या वतीने एक बोर्ड लावून आजची परीक्षा रद्द असल्याचे सांगितल्यामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

 'लाडकी बहीण'चा फटका! CM शिंदेंच्या दौऱ्यामुळे पोलीस भरती रद्द, तरुणांचा मनस्ताप, अंबादास दानवे संतापले
Mumbai Crime: मोबाइल चोरला, त्यात नवरा-बायकोचे प्रायव्हेट व्हिडीओ सापडले, मग सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ!

यावरूनच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस आयुक्तांच्या मनात आले म्हणून परीक्षा रद्द करायची का? ही काय राझाकरी आहे का? असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. याआधी विद्यार्थ्यांना 9 जुलै रोजी बोलवण्यात आलं होते.. त्यानंतर तारखेत बदल करून दोन ऑगस्ट रोजी बोलवण्यात आलं मात्र आज पुन्हा एकदा पोलीस भरती रद्द झाल्याने बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 'लाडकी बहीण'चा फटका! CM शिंदेंच्या दौऱ्यामुळे पोलीस भरती रद्द, तरुणांचा मनस्ताप, अंबादास दानवे संतापले
Akola Accident News: हिट अँड रनने अकोला हादरलं! अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; माय-लेकीचा करुण अंत; बाप-लेक जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com