अभिजित सोनावणे
नाशिकः शिवसेना आमदार सुहास कांदे (ShivSena MLA) यांच्या भुजबळ यांच्याविरोधात केलेली याचिका माघे घेण्यासाठी छोटा राजनच्या पुतण्याने धमकी देत फोन केल्याच्या आरोपानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या प्रकरणावर चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Chhota Rajan) पुतण्या अक्षय निकाळजे यांना ED ने समन्स बजावले असून, आता दोघांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत. तर, आमदार सुहास कांदे यांच्या कॉल रेकॉर्डिंगचीही करणार तपासणी होणार आहे.
हे देखील पहा-
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळांविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका मागे घेण्यात यावी यासाठी अंडरवर्ल्डचा डॉन छोटा राजनच्या पुतण्याने सुहास कांदे यांना धमकीचा फोन केल्याचा आरोप कांदे यांनी केला होता. तर या प्रकणासाठी कांदे यांनी याबाबत नाशिक पोलिस आयुक्तांना पत्रही दिले होते.
अक्षय निकाळजे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले;
त्यानंतर अक्षय निकाळजे यांनी सुहास कांदे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. अक्षय निकाळजे यांच्या म्हणण्यानुसार, कांदे यांचे मोठे भाऊ टोलनाका चालवतात. टोलनाक्यावर कार्यकर्त्यांची मारहाण झाली. त्यासाठी मी कांदे यांना फोन केला होता असे अक्षय निकाळजे यांनी स्पष्टीकरण दिले होते. पुढे अक्षय निकाळजे म्हणाले, मी कांदे यांना फोनवर कुठल्याच प्रकारची धमकी दिली नाही. शिवाय भुजबळ यांच्या विरोधातील याचिका माघे घ्या या संदर्भात आमचे कोणतेच बोलणे झाले नाही. मी भुजबळ यांना भेटलो सुद्धा नाही, असे अक्षय निकाळजे यांनी पलटवार केला होता. तर मीच आता सुहास कांदे विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हा सर्व वाद लोकप्रियतेसाठी;
तर कांदे हा सर्व वाद लोकप्रियतेसाठी करत आहेत. पोलिसांची दिशाभूल करत आहेत. तर याबाबत त्यांनी पोलीस आणि गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे करार असल्याचे सांगितलं.
दरम्यान, काल कांदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांचा उल्लेख भाई युनिव्हर्सिटी चे प्राचार्य असा केला आहे. तर याचिका माघे घेण्यासाठी आलेल्या फोन बद्दल कांदे यांनी सर्व पुरावे त्यांनी मुख्यमंत्री यांनी आणि उपमुख्यमंत्री यांनाही दिले असल्याचे त्यांनी संगीतल आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.