Samajwadi Party expels six corporators in Bhiwandi 
महाराष्ट्र

मोठी बातमी! समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics : भिवंडी महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून झालेल्या वादानंतर समाजवादी पक्षाने सहा नगरसेवकांची हकालपट्टी केलीय. प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी ही कारवाई जाहीर केली आहे.

Bharat Jadhav

  • समाजवादी पक्षाच्या सहा नगरसेवकांवर कारवाई.

  • स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पक्षांतर्गत वाद निर्माण झाल्याचे वृत्त

  • हकालपट्टीनंतर संबंधित नगरसेवकांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष

ठाणे जिल्ह्यातील मोठा राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडी महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून समाजवादी पक्षातील नगरसेवकांवर कारवाई झालीय.पक्षातील 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षश्रेष्ठींचा आदेश नाकारत गटनेते आरिफ याकूब शेख यांच्यासह ६ नगरसेवकांनी पक्षाबाहेरील भाजप आमदार महेश चौघुले यांचे खंदे समर्थक असलेल्या भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे महासभेत समाजवादी पक्षात खळबळ माजली.

यानंतर प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी समाजवादी पक्षाच्या ६ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर केलाय. पक्षाच्या हायकमांडने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जर कोणताही नगरसेवक किंवा पदाधिकारी पक्षाच्या अधिकृत निर्णयाविरोधात गेला किंवा व्हिपचे उल्लंघन केले.

तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे भिवंडी निजामपूर महापालिकेतील समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. समाजवादी पक्षाकडून ही कारवाई मागे घेण्यात येणार की त्यांचे निलंबन होणार हे पाहावे लागेल.

हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये गटनेते आरिब याकूब शेख, काशफी शाफ मोमिन, आजीब जमाल मोमिन, अन्सारी शबाना शमीम, शेख सलमाबानो मोहम्मद अक्रम आणि खान अमल उबैद यांचा समावेश आहे. स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने भिवंडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय.

स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवरून काँग्रेस, समाजवादीत नाराजी!

भिवंडी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षात नाराजी उफाळून आलीय. बुधवारी होणाऱ्या विशेष महासभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी आपल्या पक्षाच्या गटनेत्यांनी सुचवलेल्या नावांवर आक्षेप घेतलाय. काँग्रेसचे गटनेते तथा उपमहापौर तारिक मोमीन यांनी सुचवलेल्या तीन नावांना शहराध्यक्ष आबिद खान यांनी विरोध करत ही नावे मागे घेण्याची लेखी मागणी केली आहे. तर समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी भरत जंगलानी यांच्या नावाऐवजी सरफराज शेख यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्याची मागणी आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे केली. त्यामुळे स्वीकृत पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

73 लाख किलो, 295 कंटेनर, 30 कोटी किंमत; पाकिस्तानातून भारतात आणलेल्या खडेमिठाचा असा झाला पर्दाफाश

Fact Check: दारूच्या एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री? दारूच्या फ्री बॉटलसाठी दुकानांबाहेर रांगा

जमीन हादरली, घरं थरथरली; पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

बनावट औषधांविरुद्ध एफडीएची मोठी कारवाई; चार महिन्यांत ४,२५६ ठिकाणांवर धाडी, १९ कोटींचं औषधं जप्त

विद्यार्थ्यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी

SCROLL FOR NEXT