Rebel candidate Narayan Chaudhari celebrates after winning the Bhiwandi Mayor election with Congress support Saam Tv
महाराष्ट्र

भाजप फुटली, बड्या नेत्याने डाव जिंकला, काँग्रेसच्या पाठिंब्याने थेट सत्ता काबिज

Mahrashtra Politics: भिवंडी महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे एका बंडखोर उमेदवारांनं भाजपलाच चांगलाच धक्का दिलाय.. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीत कुणाला किती मतं मिळाले... आणि बंडखोर उमेदवारानं भाजपचा कसा गेम केलाय..

Bharat Mohalkar

महापालिकेच्या निकालानंतर महिनाभराच्या राजकीय नाट्यानंतर अखेर भिवंडी निजामपूर महापालिकेला महापौर मिळाला...आकड्यांच्या खेळात माहिर असलेल्या भाजपला धक्का देत बंडखोर नारायण चौधरींनी भिवंडीचं महापौरपद पटकावलंय... मात्र बंडखोर नारायण चौधरी, कोणार्क आघाडीचे विलास पाटील आणि भाजपच्या स्नेहा पाटील यांच्यातील तिहेरी लढतीत कुणाला किती मतं मिळाले...

भाजप बंडखोर नारायण चौधरींना काँग्रेसचे 30, पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 तर भाजपच्या 6 बंडखोरांची मतं मिळाली.. त्यामुळे 48 मतांसह चौधरी विजयी झाले... तर कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांना कोणार्क आघाडीचे 4, शिंदेसेनेचे 12, समाजवादी पक्षाचे 6 तर भिवंडी विकास आघाडीची 3 मतं यासह 25 मतं मिळाली.. तर भाजपच्या स्नेहा पाटलांना भाजपच्या 22 पैकी 16 मतं मिळाली...

खरंतर भिवंडी महापालिकेच्या निकालात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या... मात्र स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं... त्यामुळे महिनाभर सत्तेची समीकरण जुळवण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि शिंदेसेनेसह कोणार्क आघाडी प्रयत्न करत होते.. याच काळात जुन्या प्रकऱणावरुन कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक झाली... आणि भिवंडीच्या महापौरपदाची निवडणूक हायहोल्टेज झाली... तर भाजपनं नारायण चौधरींना डावलून स्नेहा पाटलांना उमेदवारी दिली... त्यामुळे नारायण चौधरींनी काँग्रेसमध्ये प्रवेश न करता आपला गट घेऊन सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार तारीक मोमीन यांनी माघार घेतली आणि नारायण चौधरींचा विजय झाला... मात्र याच दरम्यान बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराच भाजपनं दिलाय..

खरंतर नारायण चौधरी हे बंडखोर महापौर झाले असले तरी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश न करता स्वतंत्र गट म्हणूनच महापौरपदाची निवडणूक लढवली... आणि जिंकलीही... त्यामुळे नारायण चौधरी हे काँग्रेससोबतच राहणार की अडीच वर्षाचा महापौरपदाचा कार्यकाळ संपताच पुन्हा भाजपसोबत जाणार.. हे भविष्यात कळेलच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT