Surabhi Jayashree Jagdish
गॅसचा त्रास जाणवत असेल तर एक चमचा ओवा हळूहळू चावून खाऊ शकता. ओवा हा पोटाच्या गॅस आणि फुगण्याच्या त्रासासाठी पारंपरिक पद्धतीने वापरला जातो. ओवा चावल्यानंतर थोडे कोमट पाणी घेतल्यास काही जणांना अधिक आराम वाटतो.गॅसचा त्रास
एक चमचा आल्याच्या रसात थोडे मध मिसळून घेऊ शकता. गॅसमुळे पोटात आलेला जडपणा किंवा अस्वस्थता कमी करण्यासाठी हा घरगुती उपाय करून पाहता येतो.
गॅसचा त्रास जाणवत असेल तर एक चमचा ओवा हळूहळू चावून खाऊ शकता. ओवा हा पोटाच्या गॅस आणि फुगण्याच्या त्रासासाठी पारंपरिक पद्धतीने वापरला जातो. ओवा चावल्यानंतर थोडे कोमट पाणी घेतल्यास काही जणांना अधिक आराम वाटतो.
गॅस झाल्यावर पाणी पिणे उपयोगी ठरू शकते, पण लिंबू आणि बेकिंग सोडा एकत्र करून पिण्याचा उपाय सर्वांसाठी योग्य आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळे या मिश्रणाऐवजी साधं किंवा कोमट पाणी घेणं हा पर्याय वापरा.
गॅसमुळे पोटात अस्वस्थ वाटत असेल तर नारळपाणी घेऊ शकता. अनेकांना नारळपाण्यामुळे गॅसपासून आराम मिळू शकतो.
घाईघाईने जेवल्याने जास्त हवा पोटात जाचे आणि त्यामुळे ढेकर किंवा गॅसचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे जेवताना प्रत्येक घास नीट चावून आणि हळूहळू खा. जेवताना बोलणं, च्युइंग गम चघळणं किंवा स्ट्रॉने पेय पिणं यामुळेही जास्त हवा पोटात जाऊ शकते.
कधीतरी गॅस होणं सामान्य असू शकतं. पण पोटफुगी किंवा गॅसचा त्रास वारंवार होत असेल तर त्यामागचे कारण तपासणं गरजेचं आहे. पोटदुखी तीव्र असेल, त्रास सतत वाढत असेल किंवा इतर लक्षणांसह गॅस होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.