Bhiwandi Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi Crime : मोबाईल, घरपोडी प्रकरणी चार जण ताब्यात; ८ लाखांचे मोबाईल केले जप्त

Bhiwandi News : कोनगाव येथील एस कलेक्शन या मोबाईल दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आलेल्या चोरट्यांनी दुकानातील 29 मोबाईल चोरी केल्याची घटना २७ जुलैला घडली होती

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील मोबाईल दुकानाच्या मागील भिंत फोडून मोबाईल लांबवीले होते. या चोरीच्या घटनेतील चार जणांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी चोरीस गेलेले ८ लाख १३ हजार रुपये किमतीचे २९ मोबाईल हस्तगत करण्यात आल्याची माहिती कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली आहे.

कोनगाव येथील एस कलेक्शन या मोबाईल दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आलेल्या चोरट्यांनी दुकानातील 29 मोबाईल चोरी केल्याची घटना २७ जुलैला घडली होती. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने आरोपींबाबत कोणतीही माहिती नसताना (Bhiwandi) भिवंडीसह कल्याण, डोंबिवली आदी परिसरातील १५० सीसीटिव्ही तपासले. त्यामध्ये गुन्ह्यातील चार चोरटे हे कोनगाव येथुन ऑटो रिक्षा व रेल्वेने प्रवास करून पनवेल येथे गेले असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार तपस करत तेथून सर्वप्रथम इस्माइल नसरुद्दीन शेख (वय २६) यास ताब्यात घेतले. त्याच्या कडील तपासात इतर तीन चोरटे हे चोरीचा माल घेवुन इंदापुर, पुणे (Pune) येथे पळून गेले असल्याचे समजले.

पोलिस पथकाने इंदापुर, पुणे येथून मोहिउद्दिन नाझिर शेख ऊर्फ मुया (वय ४४), अब्दुल मजीद हसन शेख ऊर्फ मुल्ला (वय ४०), इस्माईल नसीरुद्दीन शेख (वय २६) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीचे सर्व मोबाईल नवी मुंबई येथे आपल्या बहिणीच्या घरी ठेवल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे चारही आरोपी मुळचे झारखंड येथील असून ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात फळ विक्रेते म्हणून फिरत होते. त्या दरम्यान चोरी करण्याच्या ठिकाणची रेकी करून रात्री चोरी करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे. या चार ही जणांचा पूर्वेतिहास हा चोरीचा असून या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे अशी माहिती शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Politics: 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत होणार? रोहित पवारांच्या विधानावर जय पवारांचं स्पष्ट शब्दात उत्तर

मनातल्या इच्छा अपूर्ण राहतील, विवाहित लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतील; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार ठरणार आव्हानात्मक

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये जनावरांच्या गोट्याला भीषण आग, सात जनावरांसह शेती उपयोगी साहित्य जळून खाक

Uttarakhand Accident: अंत्यविधीवरून घरी परतताना भीषण अपघात; खोल दरीत जीप कोसळून ८ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सुप्रिया सुळेनंतर काँग्रेसकडूनही मागणी

SCROLL FOR NEXT