Bhayandar News Saam tv
महाराष्ट्र

Bhayandar : तलावात पोहण्यासाठी उडी मारली तो वर आलाच नाही; भाईंदरच्या वरसावे तलावातील घटना

Bhayandar News : पहाटे पहाटे जवळच असलेल्या तलावात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी मित्र मैत्रिणी गेले होते. मात्र पोहण्यासाठी तलावात उतरला असताना खोल पाण्याचा अंदाज आला नाही यातून तरुण बुडाल्याची घटना घडली

Rajesh Sonwane

मनोज तांबे 

भाईंदर : सकाळी तलावात मित्र व मैत्रिणी पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान पोहण्यासाठी तलावात उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भाईंदरच्या वरसावे येथील तलावात घडली आहे. यावेळी सोबत असलेल्या  मैत्रिणींनी वाचविण्यासाठी जीवाचा आकांत केला. परंतु काही उपयोग झाला नाही, अखेर तरुणाचा बुडून मृत्यू झाला. 

भाईंदरच्या वरसावे तलावात आज पहाटेच्या सुमारास सदरची घटना घडली असून या घटनेत तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या शंतनू शाम चरी (वय २३) असे बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान पहाटे पाच वाजता दोन मैत्रिणी आणि एक मित्र असे तिघेजण वरसावे तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एका तरुणीला पाण्यात पोहता येत असल्यामुळे त्या तरुणीने तलावात उडी मारून पोहण्यास सुरवर केली. 

मैत्रिणीला पाहून त्याने तलावात घेतली उडी 

दरम्यान आपल्या मैत्रिणीला तलावात पोहत असल्याचे बघून शंतनू शाम चरी यांनी देखील पोहण्यासाठी उडी मारली. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला. यातून त्याला बाहेर निघता येणे शक्य झाले नाही आणि यात तो पाण्यात बुडाला. यावेळी सोबत असलेल्या दोन्ही मैत्रिणींनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

अग्निशामक दलाने काढले बाहेर 

यानंतर पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शंतनू यास बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. शंतनू चरी मिरा रोडच्या कनकीया परिसरात वास्तव्यास होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान घटनेनंतर शंतनूच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Sindhudurg: ऐतिहासिक निर्णय! कोकणातील रस्ते, वाड्यांची जातीवाचक नावे बदलली; यापुढे काय नावाने ओळखणार? वाचा लिस्ट

IND vs WI Live सामन्यात प्रेमाचा राडा, तरूणीनं तरूणाच्या कानाखाली जाळ काढला, नेमकं झालं काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Elphinstone Bridge : 59 कोटींचा अडथळा, एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम रखडणार | VIDEO

Alibaug Tourism : दिवाळी अन् किल्ल्यावर भटकंती, अलिबागजवळ वसलंय प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण

SCROLL FOR NEXT