अमोल कलये, साम टीव्ही, प्रतिनिधी
कोकणामध्ये ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गटात प्रवेश केला आहे. याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांमुळे मी अस्वस्थ असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
आज भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत 'सध्या आपलं वय पाहता आपण कुठेही जाणार नाही' असा उच्चार केला. आपल्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याशिवाय उद्धव ठाकरे हेच बाळासाहेब आणि शिवसेनेचे खरे वारसदार असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले. त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसला बाळासाहेब आणि माँसाहेब यांचा फोटो लावत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आमदार भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअपला लावलेल्या एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मेंढपाळ त्याच्या बकऱ्यांना, गुरांना आडवाटेवरुन, पाण्यातून रस्ता पार करत असल्याचे पाहायला मिळते. व्हिडीओच्या खाली 'म्होरक्या जिद्दी व धाडसी असsल तर माणसंच काय जनावरं पण विश्वास टाकतात. या व्हिडीओतून संघटना काय आहे आणि संघटना कशी घडवता येते याचा बोध घेण्यासारखा आहे' असे म्हटले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. भास्कर जाधव म्हणाले, 'मी कधीही पदासाठी काम केले नाही. माझ्या नशिबात जे होते ते मला मिळाले. मी कोणत्याही राजकीय डावपेचांमध्ये सहभागी झालो नाही. मी अनेक पदे भूषविली. पण कधीही अभिनय केला नाही. कोणतीही चाल खेळली नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.