Bharat Jodo Nyay Yatra Saam Digital
महाराष्ट्र

Bharat Jodo Nyay Yatra: आसाममध्ये राहुल गांधींची 'महोब्बत की दुकान', भारत जोडो न्याय यात्रा अडवणाऱ्या जमावाला दिला फ्लाइंग किस, पाहा व्हिडिओ

Bharat Jodo Nyay Yatra News: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात येत आहे. सध्या ही यात्रा आसाममधून जात आहे. दरम्यान राज्यातील सोनितपूर जिल्ह्यात जमावाने राहुल गांधींची बस अडवली आणि मोदी मोदीच्या घोषणा दिल्या.

Sandeep Gawade

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात येत आहे. सध्या ही यात्रा आसाममधून जात आहे. दरम्यान राज्यातील सोनितपूर जिल्ह्यात जमावाने राहुल गांधींची बस अडवली आणि मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांनीही आपल्या अंदाजात या जमावाला फ्लाईंग किस दिला. यावेळी राहुल गांधी बसमधून खाली उतरले होते. मात्र, त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना बसमध्ये बसण्यास सांगितले.

राहुल गांधींनी याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला आहे. 'सबके लिए खुली है मोहब्बत की दुकान, जुड़ेगा भारत, जीतेगा हिंदुस्तान' असा संदेशही त्यांनी व्हिडिओसोबत दिला आहे. राहुल गांधींच्या बसबाहेर गर्दीही दिसत आहे. गर्दीतले लोक भाजपचे झेंडे हातात घेतलेले दिसलेले दिसत आहेत. गर्दीतील काही लोक राहुल गांधींच्या बससमोरही आले. यानंतर राहुल गांधी बसमधून खाली उतरले आणि जमावात गेले. दरम्यान यात्रेला कव्हर करणार्‍या व्लॉगरचा कॅमेरा, बिल्ला आणि इतर उपकरणे जमावाने हिसकावून घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पक्षाच्या सोशल मीडिया टीमच्या सदस्यांनाही मारहाण करण्यात आली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याचवेळी सोनितपूरमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्या गाडीवरही आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या कॅमेरा क्रूवर हल्ला झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. जयराम रमेश यांनी सांगितले की सोनितपूरमधील जुमुगुरीघाट येथे भाजप कार्यकर्त्यांच्या बेशिस्त जमावाने त्यांच्या कारवर हल्ला केला आणि विंडशील्डवरील भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर्सही फाडले. त्यांनी पाणी फेकले आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या, पण आम्ही शांतता राखली. आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना ते म्हणाले की, निःसंशयपणे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे सर्व घडवून आणत आहेत. आम्ही घाबरणार नाही, लढत राहू, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

SCROLL FOR NEXT