Shiv Sena (Shinde faction) minister Bharat Gogawale during Republic Day flag hoisting ceremony in Raigad. Saam Tv
महाराष्ट्र

अखेर भरत गोगावलेंची एक इच्छा पूर्ण, मात्र पालकमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही अपूर्ण

Republic Day Relief For Bharat Gogawale: शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावलेंची अखेर आज एक इच्छा पूर्ण झाली आहे. मात्र गोगावलेंचं आणखी एक मोठं स्वप्न पूर्ण होणं बाकी आहे. ते कोणते ?

Omkar Sonawane

आधी मंत्रिपदासाठी शिवलेल्या कोटाची घडी मोडण्यासाठी पाहावी लागलेली वाट.... आणि त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाने दिलेली हुलकावणी... त्यामुळे अस्वस्थ असलेल्या रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावलेंना अखेर ध्वजारोहणाचा मान मिळालाच... आणि गोगावलेंनी पालकमंत्रिपदाची आशाही उफाळून आली...

खरंतर महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भरत गोगावलेंची मंत्रिपदी वर्णी लागली.. मात्र रायगडचं पालकमंत्रिपद काही मिळालंच नाही...त्यातच 2025 मधील प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भरत गोगावलेंना डावलून आदिती तटकरेंनाच ध्वजारोहणाचा मान मिळाला...

तेव्हापासून गोगावले ध्वजारोहणासाठी रुसले होते... त्यातच नगरपालिका निवडणुकीत भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले गुन्हा दाखल झाल्यानं फरार होते..यामुळे उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीसांवरही ताशेरे ओढले... त्यामुळे भरत गोगावलेंना रायगडच्या ध्वजारोहणाचा मान मिळण्याबाबत शंका उपस्थित केली जात होती.. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान मिळाला. मात्र या ध्वजारोहणानंतर आता गोगावलेंचा पालकमंत्रिपदाचाही झेंडा फ़डकणार का? याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: बर्फाळ वादळात विमानाचा भीषण अपघात; टेकऑफ करतानाच कोसळलं विमान, ७ जणांचा मृत्यू

विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना मुंबईच्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

सरकार देणार गरिबांना 2 हजार? गरिबांसाठी केंद्र सरकारची नवी योजना?

लाडक्या बहिणींना शब्द, 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगितलं

मुंबईत शिंदेसेनेची स्वतंत्र गटनोंदणी? शिंदेंना भाजपसोबत संयुक्त गटनोंदणी का नको?

SCROLL FOR NEXT