Bhandara Devhadi Gram Panchayat member murder Saam Tv News
महाराष्ट्र

Bhandara Crime : दोघांची घनिष्ट मैत्री, बायकोचं मित्रासोबत विवाहबाह्य संबंधाचा संशय, ग्रामपंचायत सदस्याला घरातच संपवलं

Bhandara Murder News : दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमनस्य निर्माण झालं होतं. दोघांमधील वाद मिटावा आणि दोघांमध्ये समेट घडावा यासाठी आज दोघेही मृतकाच्या घरी एकत्र आलेत. बुलढाण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

Prashant Patil

शुभम देशमुख, साम टीव्ही

भंडारा : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार, तरुणींवर अत्याचार या प्रकारच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. त्याचदरम्यान, भंडारामध्ये एक धक्कादायक तसेच भयंकर घटना उघडकीस आली आहे. पूर्व वैमनस्यातून आपल्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीचे मृतकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपीला संशय होता. त्यातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

ही थरारक घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावात आज सायंकाळी घडली. अंकुश साठवणे (वय ३८) असं मृतकाचं नाव आहे. मृतक हा देव्हाडी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. तर, मुन्ना बिरणवार (वय ३२) असं आरोपीचं नावं असून त्याला तुमसर पोलिसांनी चाकूसह ताब्यात घेतलं आहे. आरोपी आणि मृतक यांच्यात घनिष्ट मैत्री होती. मात्र, आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले.

दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन वैमनस्य निर्माण झालं होतं. दोघांमधील वाद मिटावा आणि दोघांमध्ये समेट घडावा यासाठी आज दोघेही मृतकाच्या घरी एकत्र आलेत. मात्र, आरोपीने जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकूने मृतकावर सपासप वार करायला सुरुवात केली. अंकुश साठवणे यांच्यावर चाकुने हल्ला केल्याने त्यांना वाचविण्यासाठी त्यांची पुतणी आकांक्षी धावून आली. यात ती ही जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत आहे. दरम्यान, आरोपीला तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला; 6 मजूर दबले, बचाव कार्य सुरू

Kairi Bhel Recipe: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी झटपट घरी बनवा कैरीची चटपटीत भेळ, वाचा सोपी रेसिपी

Pune News: झेडपीच्या शाळांमध्ये आता १० वीपर्यंतचे शिक्षण; पुणे जिल्ह्याचा निर्णय

Self Enumeration Census: India Census 2026: अखेर जनगणनेला सुरूवात! घरबसल्या 'स्व-गणना' करण्याची प्रक्रिया कशी आहे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update : नकाशा बदलण्यामागे कोण आहे ? याचा शोध घेतला पाहिजे - जयंत पाटील..

SCROLL FOR NEXT