Unseasonal rain with strong winds in Bhandara district Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Weather Today: भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

Bhandara Weather Forcast: राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर भंडारा जिल्ह्यात आगामी ३ दिवसासाठी येलो अलर्ट वर्तविण्यात आला आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने ३ दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार आज सकाळी भंडारा (Bhandara) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी देखील जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Rain) झोडपून काढलं होत. यामुळे चांगलीच धावपळ उडाली असून वादळी वाऱ्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर भंडारा जिल्ह्यात आगामी ३ दिवसासाठी येलो अलर्ट वर्तविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. यानंतर आज परत सकाळ पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पाहता पाहता काळे ढग दाटून आले व मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसणार आहे.  

पावसाने पिकांचे नुकसान

रब्बी हंगामातील धान पिक शेतकऱ्यांनी (Farmer) कापून ठेवले असल्याने आधीच आलेल्या पावसामुळं संपुर्ण धान पिकं पाण्याने भिजले होते. आता परत पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

Maharashtra News Live Update: Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT