Bhandara Police Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

Bhandara News : राजस्थानमधून दोघेजण संभाजीनगरात आले. प्रतिबंधित असलेला डोडा वाहतूक करण्यासाठी अगोदर वाहनाची चोरी केली. यांनतर यातून वाहतूक सुरु केली. मात्र जीपीएस सिस्टीममुळे ते फसले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: छत्रपती संभाजीनगर इथून कार चोरून त्यातून प्रतिबंधित असलेला डोडा (अफुचे टरफल) भंडारा मार्गे विक्रीसाठी नेण्यात येत होता. याच दरम्यान भंडारा पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित असलेल्या ३०७ किलो डोडा जप्त केला आहे. तसेच या कारवाईत वाहतूक करणाऱ्या राजस्थानच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

भंडाऱ्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजस्थान मधील दोघांना ताब्यात घेतलं आहे. दिलीप बिश्नोई (वय २४) आणि जयप्रकाश बिस्नोई (वय २५) असं या प्रतिबंधित पदार्थाची वाहतूक करताना भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही राजस्थान मधील जोधपुर जिल्ह्यातील फलोदी येथील आहे. या दोघांनी प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करण्याकरिता छत्रपती संभाजीनगर येथून वाहन चोरी केले. 

चोरीच्या वाहनातून डोडा वाहतूक 

चोरी केलेल्या या वाहनात १६ पोत्यांमध्ये ३०७ किलो हे प्रतिबंधित पदार्थ भरून त्याची वाहतूक करीत होते. दरम्यान चोरी केलेल्या हा वाहनाला जीपीएस लागलं असल्यानं छत्रपती संभाजीनगरचे पोलीस या वाहनाच्या मागावर होते. सदर वाहन भंडाऱ्याच्या दिशेने जात असल्याचे समजल्यानंतर याची माहिती त्यांनी भंडारा पोलिसांना दिली होती. त्यानुसार भंडारा पोलिसांनी सापळा रचला होता. 

हॉटेलवर थांबले असता पोलिसांची कारवाई 

नागपूर ते भंडारा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये हे दोघेही थांबले असताना भंडारा पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं. या कारवाईत भंडारा पोलिसांनी प्रतिबंधित पदार्थ आणि वाहन असा ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जवाहरनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भंडारा पोलिसांचे सध्या जागर नशा मुक्ती अभियान सुरू असून या अभियानादरम्यान करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT