St Strike Saam tv
महाराष्ट्र

St Strike: कामावर रूजू झाले अन्‌ नैराश्‍यातून कर्मचाऱ्याची आत्‍महत्‍या

कामावर रूजू झाले अन्‌ नैराश्‍यातून कर्मचाऱ्याची आत्‍महत्‍या

अभिजीत घोरमारे

भंडारा : राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारींच्‍या सुरू असलेल्‍या संपातून नुकताच कामावर रुजू झाले. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याची घटना मथाडी शेत शिवारात (St Strike) उघडकीस आली. (bhandara news st strike st Employee suicide due to depression)

राज्‍य परिवहन (MSRTC) महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मागील साडेतीन महिने संपात सहभागी राहिल्‍यानंतर नुकताच संपातून परत येत आपल्या कामावर रुजू झालेले भंडारा आगारातील चालकाने शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. सदर दुर्देवी घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या मथाडी शेत शिवारात घडली आहे. आंबाडी येथील भिमराज कळंबे (वय 51) असे मृतकाचे नाव आहे.

वाटसरूंना दिसला मृतदेह

आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी नैराश्यातून कळंबे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास वाटसरुंना भीमराव यांचे लटकलेले शव दिसल्यामुळे संबंधित घटना उघडकीस आली आहे. याची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. भीमराव यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे आंबाडी गावात शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : कार्यकर्त्यांना हेच शिकवता? गद्दार म्हटल्यानंतर शिंदेंचा पारा चढला, थेट कार्यलात जाब विचारला, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates : मनसेसोबत युती नसताना पोस्टर लावले, हिंगोलीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा

Success Story: कोण म्हणतंय लग्नानंतर करिअरला ब्रेक लागतो? घर आणि नोकरी सांभाळत UPSC क्रॅक; IPS तनुश्रीची यशोगाथा!

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

SCROLL FOR NEXT