Bhandara Accident News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Accident News: ओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव ट्रकची बसला धडक; दोन्ही चालक जखमी

Bhandara News ओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव ट्रकची बसला धडक; दोन्ही चालक जखमी

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : पवनीकडून भंडाराकडे येत असलेल्या ट्रकने भंडारावरून पवनीकडे जात असलेल्या बसला जोरदार धडक (Accident) दिली. ट्रक चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरधार धडक दिल्याची घटना अड्याळ (Bhandara) पवनी मार्गावरील नेरला उपसा जवळ घडली. (Maharashtra News

भंडाराकडून पवनीकडे ३० प्रवासी घेऊन बस पवनीकडे मार्गस्थ झाली होती. याचवेळी पवनीकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसला समोरून धडक दिली. बसचालकाने समयसुचकता दाखवत बस रोडच्या कडेला घेऊन जात थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला असून बसमधील प्रवासी सुखरूप बचावले आहेत. 

चालक जखमी  

या अपघातात ट्रक चालक हा गंभीररित्या जखमी झाला. तर बस चालक किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार प्रशांत मिसाळे यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळ गाठत जखमींना प्राथमिक उपचारार्थ अड्याळ येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र ट्रकचालक गंभीर जखमी असल्या कारणाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT