Snake Bite Saam tv
महाराष्ट्र

Snake Bite : रात्री झोपेतच सर्पदंश; सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

Bhandara News रात्री झोपेतच सर्पदंश; सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: रात्री कुटुंब घरात झोपलेले असतांना मुलीच्या अंगावरून साप गेला. यामुळे जागे झालेल्या मुलीला सर्पाने दंश (Snake Bite) केला. यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र विषारी मण्यार जातीचा (Bhandara) साप असल्याने विष संपूर्ण शरीरात पसरल्याने मुलीचा उपचार सुरु होण्यापूर्वीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नवरगाव येथील मोनाली गुर्वे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. गूर्वे कुटुंब रात्री घरात झोपले असताना मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मोनाली ही उठून बसली. तिला काहितरी रुतल्यासारखे वाटले. यामुळे तिने आई वडिलांना उठविले. यानंतर लाईट सुरू करुन पाहिल्यावर भला मोठा साप दिसून आला. मण्यार जातीचा सापाने मोनाली गुर्वे हिला दंश केला होता. 

उपचारापूर्वीच मृत्यू 

मोनाली हिला रात्रीच तुमसर येथिल रुग्णालयात हलविण्यात आले. पण हा साप विषारी असल्याने संपुर्ण विष मोनालीच्या शरीरात पसरल्याने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. मोनाली ही गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीच्या वर्गात शिक्षणं घेत होती. मोनालीच्या मृत्यूमुळे गुर्वे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुन्हा मोठा राजकीय भूकंप! एकवेळ भाजपसोबत जाऊ, पण शिंदेंसोबत नाही; राऊतांनी बॉम्ब फोडला

Marathi Movie: आग्रा स्वारीचे शौर्य पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा ट्रेलर थरारक ट्रेलर प्रदर्शित

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Haldi Kumkum Rangoli Design: हळदी- कुंकूवासाठी काढा या 5 सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या

Reduce Electricity Bill : तुम्हालाही लाईट बील प्रमाणाच्या बाहेर येतय? कमी करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT