Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : भंडाऱ्यात कामगार कार्यालयाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; पाच ते सहा महिला गंभीर जखमी, VIDEO

Bhandara News In Marathi : भंडाऱ्यात कामगार कार्यालयाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली. या घटनेत पाच ते सहा महिला गंभीर जखमी माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

शुभम देशमुख, साम टीव्ही

भंडारा : भंडाऱ्यात पेटी वाटपाच्या कार्यक्रमात महिलांची तुफान गर्दी झाली. या महिलांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सोम्य लाठीचार्ज करावा लागला. यानंतर महिलांची चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. भंडाऱ्यातील अग्रेसन भवन या ठिकाणी ही घटना घडली आहे.

चेंगराचेंगरीत काही महिला गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील कामगार कार्यालयाच्या माध्यमातून अग्रेसन भवन मंगल कार्यालयात पेटी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी महिलांवर सोम्य लाठीचार्ज करून करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

मागील काही दिवसांपासून पेटी मिळावी, यासाठी भंडाऱ्यातील ग्रामीण भागातील महिलांची एकच गर्दी झाली. भंडाऱ्यातील नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील अग्रेसन भवन येथे पेटी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी मध्यरात्रीपासून भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित झाल्या होत्या. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती.

'लाडक्या बहिणीं'वर लाठीचार्ज'

या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या महिलांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सोम्य लाठीचार्ज केला. यामुळे काही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या जखमी महिलांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकीकडे राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येत असताना भंडाऱ्यामध्ये लाडक्या बहिणींवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भावली धबधबा पर्यटक मारहाण आणि विनयभंग प्रकरण, ९ आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

जेवणासोबत तोंडी लावायला बनवा कुरकुरीत सुरणाचे काप, सोपी आहे रेसिपी

Devendra Fadnavis: ४८ हजार कोटीचं वीजबिल माफ अन् दिवसा १०० टक्के वीज; कर्जमाफीनंतर सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Cabinet Expansion : फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 'या' मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळबळ

रात्री कोणत्या दिशेला डोके करून झोपावे?| Sleeping Position

SCROLL FOR NEXT