Ordnance Factory Saam TV
महाराष्ट्र

Ordnance Factory: भंडारा शहरात मोठी दुर्घटना; ऑर्डिनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट, १ ठार

Ordnance Factory Blast: घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, स्फोट इतका भीषण होता की यात आतमध्ये असलेल्या एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सी एक्स विभागात हा स्फोट झाला आहे.

Ruchika Jadhav

Bhandara News:

भंडारा शहरालगत जवाहरनगर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डिनन्स फॅक्टरी) भीषण स्फोट झालाय. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, स्फोट इतका भीषण होता की यात आतमध्ये असलेल्या एका कर्मचाऱ्याचा यात जागीच मृत्यू झालाय. सी एक्स विभागात हा स्फोट झाला आहे. मृतकाचे नाव अविनाश मेश्राम असे आहे. सी एक्स हा केमिकलचा एक विभाग आहे.

अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामाला आले होते. ही शिफ्ट पहाटे 6 वाजता सुरू होते. काम करत असताना आपल्यावर एवढं मोठं संकट ओढावेल आणि आपला मृत्यू होईल अशी कल्पनाही त्यांच्या मनात आली नसेल. मात्र नियतीच्या मनात वेगळाच खेळ सुरू होता.

त्यांनी काम सुरू केल्यानंतर अडीच तासात ही घटना घडली. स्फोट होताच ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये खळबळ उडाली. लगेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फॅक्टरीचे अग्नीशमन दल पुढे सरसावले. त्यांनी लगेच आग आटोक्यात आणली. मात्र या दुर्घटनेत अविनाश मेश्राम यांचा मृत्यू झालाय.

घटनेनंतर येथील कर्मचाऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे. यापूर्वीही भंडारा शहरालगत असलेल्या सनफ्लॅग कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये तीन कर्मचारी भाजले होते. यावर्षी भंडारा जिल्ह्यात स्फोट होण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे शहरातील सर्वच नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT