Bhandara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime News: बहिणीशी प्रेम प्रकरणातून केले लग्न; मनात राग ठेवून केला प्राणघातक हल्ला

बहिणीशी प्रेम प्रकरणातून केले लग्न; मनात राग ठेवून केला प्राणघातक हल्ला

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख

भंडारा : बहिणीशी प्रेम प्रकरणातून लग्न केल्याच्या कारणातून मनात राग ठेवून साल्‍यांनी जावयावर कुऱ्हाडीने प्राणघातक (Crime News) हल्ला केला. ही घटना पालांदूर परिसरातील कवडसी खैरी येथे (Bhandara News) घडली आहे. ओमप्रकाश बळीराम पडारे (वय २७, रा.जैतपूर ता. लाखांदूर) असे जखमीचे नाव आहे. (Latest Marathi News)

ओमप्रकाश पडारे हा लाखनी तालुक्यातील गुरढा येथे ट्रॅक्टरवर काम करतो. याच दरम्‍यान दैनंदिन कामाच्या उपयोगाचे साहित्य आणण्यासाठी जात असताना पालांदूरच्या कवडसी खैरी येथे पंचशील बौद्धविहाराच्या पुढे संजीत घटारे व रंजित घटारे यांनी समोरासमोर येऊन ओमप्रकाशच्‍या दुचाकीला धडक देत त्याला (Police) खाली पाडले. दोन्ही भाऊ एकाच मोटरसायकलवर होते. तर ओमप्रकाश एकटाच होता. याचवेळी जखमीचे चूलतभाऊ मागून दुचाकीने येत होते. जखमीला दोन्ही भावांनी जमिनीवर पाडून संजित आणि रंजितने कुऱ्हाडीने वार केले. यात ओमप्रकाश रक्ताच्या थारोड्यात पडला.

ग्रामस्‍थांनी पकडून दिले

हा प्रसंग पाहून जवळच असलेल्या रंजित वालदे आणि आशिष मेश्राम यांनी वाचविण्याकरिता धाव घेतली. यावेळी आरोपी यांनी घटनास्थळावरून पळ काढला. गावकऱ्यांनी संजीत घटारेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर रंजित याने कुऱ्हाड नहरात फेकून पसार झाला आहे. जखमी ओमप्रकाशला त्याचे चुलतभाऊ जगदीश पडारे व जयप्रकाश पडारे यांनी तात्काळ पालांदूर येथे उपचारार्थ दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT