Panchayat samiti Election Saam tv
महाराष्ट्र

Panchayat Samiti Election : भंडारा जिल्ह्यातील चार पंचायत समितींवर महायुतीचा झेंडा; दोन समितींवर मविआची सत्ता

Bhandara News : भंडारा जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समितीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाला आहे. हि मुदत संपल्याने पुढील अडीच वर्षासाठी सभापती व उपसभापती निवड करण्यासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड करण्यासाठी आज निवडणुक प्रक्रिया पार पडली. यात जिल्ह्यातील चार पंचायत समितींवर महायुतीचा झेंडा अर्थात भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी सत्ता काबीज केली. तर दोन पंचायत समितींवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले. या निवडीनंतर जिल्हा परिषदेकडे लक्ष आहे. 

भंडारा जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समितीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाला आहे. हि मुदत संपल्याने पुढील अडीच वर्षासाठी सभापती व उपसभापती निवड करण्यासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा, लाखांदूर या ठिकाणी भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वर्चस्व दिसून आले. तर लाखनी व पवनी या ठिकाणी महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले. 

अशी झाली निवड 

लाखांदूर पंचायत समितीचे सभापती म्हणून भाजपचे पुरुषोत्तम ठाकरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापती संजना वरखडे, लाखनी पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे अश्विनी कानेकर सभापती, उपसभापती पदी सुनील बांते, मोहाडी पंचायत समितीवर सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश शेंडे, तर भाजपचे देवा चकोले यांची उपसभापतीपदी निवड झाली. पवनी पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे नारनवरे हे सभापती म्हणून तर उपसभापती भाजपचे प्रमोद मेंढे यांची निवड झाली. भंडारा पंचायत समितीमध्ये भाजपच्या कल्पना कुर्जेकर यांची सभापती म्हणून तर उपसभापती म्हणून राष्ट्रवादीचे नागेश भगत यांची निवड झाली. तुमसर पंचायत समितीमध्ये सभापतीपदी राष्ट्रवादीच्या दीपा गौपाले तर उपसभापती भाजपच्या सुभाष बोरकर यांची निवड झाली. 

आता जिल्हा परिषदेकडे लक्ष 

जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीची सभापती, उपसभापती निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे. यात महायुती व महाविकास आघाडीचा चांगलाच कस लागल्याचे पाहण्यास मिळाले. तर आता २७ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता स्थापन होते व अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT