Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; वीज पडून एकाचा मृत्यू

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात काल सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली यातच भंडारा आणि लाखनी येथे वीज कोसळल्याच्या दोन घटना घडल्या असून यात जीवित व वित्त हानी झाली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: राज्यातील अनेक भागात अजूनही जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. यात सोलापूर, भंडारा जिल्ह्यात काल जोरदार तडाखा बसला आहे. यातच भंडारा जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये जिल्ह्यात वीज कोसळल्याच्या दोन घटना घडल्या असून एका गुराख्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत घराचे नुकसान झाले आहे. 

राज्यात दोन आठवड्यांपूर्वी सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु होता. तर मागील आठवड्यापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून काल सायंकाळपासून भंडारा व सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट व वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून यात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यात वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. 

गुराख्याच्या मृत्यू 

जिल्ह्यातील भंडारा आणि लाखनी तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली. एका घटनेत भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार शेतशिवारात पाळीव जनावर चराईसाठी गेलेल्या बबन भदाडे (वय ५२) या गुराख्यावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरांना गेले असताना अचानक विजांचा कडकडाट होण्यास सुरवात झाली. यामुळे झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

वीज कोसळून घराचे नुकसान 

दुसऱ्या घटनेत लाखनी तालुक्यातील बोरगावं राजेगाव येथील दुर्गाप्रसाद लांडेकर यांच्या घरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे घरातील वीज उपकरणांसह काही साहित्य जळून खाक झालं. तसेच वीज कोसळल्याने घराच्या खिडक्याचे काच फुटले आहेत. तर भिंतींना तडे गेलेत. घटनेच्या वेळी घरात कुणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Maharashtra News Live Update: नंदूरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे धरणांतील पाणीसाठात झपाट्याने घट

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Genelia Deshmukh Photos: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

Pune Railway Station: स्लिपींग पॉड्स, AC लाउंज, वाय-फाय अन् बरंच काही; पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त ४० रुपयांत राहायची सोय

SCROLL FOR NEXT