Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: मंदिराच्या प्रवेशद्वाराचे गेट लावताना घडले दुर्दैवी; विद्युत धक्का लागून मजुराचा मृत्यू

Bhandara News : मंदिराच्या प्रवेशद्वाराचे गेट लावताना घडले दुर्दैवी; विद्युत धक्का लागून मजुराचा मृत्यू

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : गजानन महाराजांच्या मंदिराला सुरक्षा म्हणून लोखंडी गेट लावण्यात येत आहे. या गेटचे काम सुरु असताना मजुराला विजेचा जोरदार (Electric Shock) झटका बसला. यात त्या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Lakhandur) लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली आहे. (Latest Marathi News)

भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यात येत असलेल्या जैतपूर येथे ही घटना घडली आहे. चंद्रशेखर खुशाल कुत्तरमारे (वय ३५) असे मृत मजुराचे नाव आहे. स्थानिक जैतपूर येथे गजानन महाराजाचे मंदिर आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वारावर लोखंडी गेट लावण्याचे काम सुरू होते. या कामावर घटनेतील मृतक चंद्रशेखर मजूर म्हणून मजुरी काम करीत होता. मजुरी काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने चंद्रशेखर जखमी झाला. 

रुग्णालयात नेले परंतु अखेर मृत्यू 

सदर घटनेची माहिती परिसरातील नागरिकांसह गावकऱ्यांना मिळाली. यानंतर संबंधितांनी चंद्रशेखरला तात्काळ उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी चंद्रशेखरला तपासून मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT