Bhandara Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Heavy Rain : भंडाऱ्यात पुन्हा संततधार पाऊस; अनेक घरांमध्ये शिरले पाणी, राज्य मार्गावरही साचले पावसाचे पाणी

Bhandara News : विदर्भात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहण्यास मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : भंडाऱ्यात आज पुन्हा सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे भंडारा- तुमसर राज्य मार्गावर पाणी साचल्याचे दृश्य दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीस अडचणी येत आहेत. तर शहरातील वैशाली नगर व रुख्मिनी नगर येथे घरांत पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

विदर्भात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहण्यास मिळत आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून लाखनी तालुक्यातील ग्राम किन्ही येथे पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरला आहे. तर सातत्याने पाऊस (Rain) पडत असल्यामुळे गावातील गाई- म्हशीचे गोटे कोसळले  तर घरे देखील कोसळले आहेत. ग्रामपंचायतने गावातील नाल्याची सफाई न झाल्यामुळे रोडवर पाणी येत आहे. तर अनेकांच्या घरात पाण्याने शिरकाव केला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय भंडारा- तुमसर मार्गावर देखील आणि आले आहे. या सर्व परिस्थितीमुळे पुन्हा एकदा तुमसर नगर परिषदेच्या ढिसाळ कारभार सामोर आल्याचे दृश्य दिसत आहे. 

भंडारा शहरातील घरांत शिरले पाणी
आज भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मागील तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर काल रात्रीपासून भंडारा जिल्हात (Heavy Rain) मुसळदार पावसाने हजेरी लावली केली आहे. यामूळे आज सकाळपर्यंत भंडारा शहरातील वैशाली नगर व रुख्मिनी नगर येथे किराणा दुकान आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे दर वर्षी नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT