मोठा अनर्थ टळला; तलवारी घेऊन फिरणारे दोघेजण अटकेत! SaamTvNews
महाराष्ट्र

Breaking : मोठा अनर्थ टळला; तलवारी घेऊन फिरणारे दोघेजण अटकेत!

मोठ्या घातपाताच्या उद्देशाने चारचाकी वाहनातून तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना भंडारा शहर पोलिसांनी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान अटक केली आहे.

अभिजित घोरमारे

भंडारा : मोठ्या घातपाताच्या उद्देशाने चारचाकी वाहनातून तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना भंडारा शहर पोलिसांनी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान अटक केली आहे. सत्यजित मनोहर गजभिये व मनोज हिराचंद मेश्राम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी रामटेक येथील रहिवासी आहेत. या कारवाईत भंडारा पोलिसांनी चारचाकी वाहनासह दोन तलवारी जप्त केल्या असून पोलिसांच्या समय सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

हे देखील पहा :

भंडारा जिल्ह्यात सध्या पोलिसांकडून 'ऑल आऊट मिशन' सुरु असून शुक्रवारी मध्यरात्री दरम्यान भंडारा शहरातील शास्त्री चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. वरठी कडून वेगाने येणारी चारचाकी (क्रमांक MH 14 BX 9034) पोलिसांनी अडवली. गाडीत बसलेल्या मधील दोन इसमांची विचारपूस केली असता पोलिसांना या दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता मागील सीट खाली एक मोठी व एक लहान अश्या दोन तलवारी आढळून आल्या.

पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली असून त्यांच्या कडील दोन तलवारी व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. भंडारा पोलिसांनी आरोपींविरूद्ध बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT