Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत पहाटे स्फोट; ३ कामगार जखमी, परिसरातही बसले हादरे

Bhandara News : स्टील कंपनीत झालेला स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेला परिसर देखील हादरले होते. पहाटेच्या सुमारास झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिकांमध्ये घाबरत पसरली होती

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास स्फोट (Blast) झाला. यात ३ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले. तर या दुर्घटनेत ७- ८ कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर (Bhandara) प्राथमिक उपचार करण्यात आले. (Latest Marathi News)

भंडाऱ्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीतील एसएमएस या विभागातील एलएचएफ युनिटमध्ये ही घटना झाली आहे. घटनेचे मूळ कारण अजून गुलदस्त्यात असून हिटिंग फरनेसमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाली. या भागात कार्यरत ३ कामगार काही प्रमाणात भाजले गेले आहेत. काही कामगारांना किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात टेक्निसीयन नामदेव झंझाड, अभियंता सागर जमाणे व कंत्राटी कामगार हटवार हे जखमी झाले. त्यांना नागपूर (Nagpur) येथे हलवण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिसरातही बसले हादरे 

स्टील कंपनीत झालेला स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेला परिसर देखील हादरले होते. पहाटेच्या सुमारास झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिकांमध्ये घाबरत पसरली होती. या दुर्घटनेत कंपनीतील सामानाचे देखील मोठे नुकसान झाले असून सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप आमदारासह 100 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

Bridal Skin Care Tips: नवरीसाठी खास 5 स्किनकेअर टिप्स, लग्नात चेहऱ्यावर येईल चमक

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT