Bhandara News  Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : अतिक्रमणावरून वाद; व्यावसायिकाकडून वृद्धावर प्राणघातक हल्ला

Bhandara News : भंडारा शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यवसायिकाने अतिक्रमणाच्या कारणावरुन वृद्धावर चाकूने प्राणघातक हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : अतिक्रमणाच्या वादातून एका व्यवसायिकाने वृद्धावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना भंडारा (Bhandara) शहरातील शिवाजी वार्डात घडली. हा मारहाणीच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Live Marathi News)

भंडारा शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यवसायिकाने अतिक्रमणाच्या कारणावरुन वृद्धावर चाकूने प्राणघातक हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. भंडारा शहरातील शिवाजी वार्डातील शासकीय जागेवरील (Crime News) असलेल्या अतिक्रमणाला विरोध केला जात आहे. याचा वाद असल्याने या अतिक्रमण संदर्भात मागील काही वर्षांपासून परिसरातील नरेंद्र रामटेके हे न्यायालयीन लढा देत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान २१ एप्रिलला रात्री ८.३० वाजता नरेंद्र रामटेके हे घराजवळील छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोर उभे असताना एका व्यावसायिकाने रामटेके यांना पकडून मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या मारपीटमध्ये रामटेके हे जखमी झाले आहेत. जखमीने तत्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT