Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : वाळू माफियाकडून मागितली २० हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या ताब्यात

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे. या वाळूला विदर्भात मोठी मागणी आहे. त्यासाठी वाट्टेल तेथे वाळू चोरटे वाळूचा उपसा करतात

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: मोहाडी तालुक्यात तलाठी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. वैनगंगा नदीतून अवैधपणे (Bhandara) वाळू उपसा केली जाते. अशा प्रकारे वाळू उपसा केल्यानंतर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना (ACB) लाचलुचपत विभागाच्या पथकाने तलाठ्याला ताब्यात घेतले आहे. 

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे. या वाळूला विदर्भात मोठी मागणी आहे. त्यासाठी वाट्टेल तेथे वाळू चोरटे वाळूचा उपसा करतात. अशाच प्रकारे ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून जात असताना तलाठी वैभव जाधव याला दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर जप्त करतो; नाही तर २५ हजार रूपये (Bribe) मला दे अशी मागणी केली. पण मालकाकडे पैसे आज नाही, उद्या २० हजार रूपये देतो असे ट्रॅक्टर चालकाने सांगितले. 

पण ट्रॅक्टर मालकाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यानी (Bhandara ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सापळा रचून आरोपी तलाठी याला लाचेची रक्कम देण्यात येत असल्याने तलाठी याला संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. त्यामुळे आरोपी वैभव जाधव याला ताब्यात घेत मोहाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT