Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : अंत्यसंस्कारासाठी जमलेल्यांनी अचानक काढला पळ; स्मशानभूमीत घडले भयानक

Bhandara News : अंत्यसंस्कारासाठी जमलेल्यांनी अचानक काढला पळ; स्मशानभूमीत घडले भयानक

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : स्मशानभूमीत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार होत असताना मृतदेहाला अग्निडाग देताच मधमाश्यांना हल्ला चढविला. यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी (Bhandara) जमलेल्या नागरीकांची पळापळ सुरु झाली. मृतदेहाला सोडून नागरिकांनी स्मशानभूमीतून काढता पाय घेतला. हि घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. (Tajya Batmya)

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येत असलेल्या हरदोली/ झंझाळ येथे ही घटना घडली आहे. गावातील मारोती कबल गायधणे यांचा मृत्यू झाल्याने आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांसह गावातील नागरिक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जमले होते. मृतदेहाला अग्निडाग देताच येतुन निघालेला धूर वर झाडावर बसलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यापर्यंत पोहचला. यामुळे मधमाशा उडाल्या आणि त्यांनी नागरीकांवर हल्ला केला. जमलेल्या अंत्यसंस्कारासाठी नागरीकांची एकच तारांबळ उडाल्याची घटना चक्क मय्यत जळत असताना नागरीकांनी  पळ काढीत सुटकेचा निश्वास घेतला आहे.


भंडारा जिल्ह्यातील हरदोली येथील स्मशानभूमीत हा प्रकार घडला आहे. सदर ठिकाणी चिंचव्हाचे झाड असून आग्या मोहतेल या झाडावर बसले होते. मय्यात जळत असतान्हा धूर गेल्याने मधमांशानी हल्ला चढवीला. त्यामुळे मधमाश्यांच्या हल्यापासून बचाव करण्यासाठी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरीकांनी सुसाट पळ काढला. ही भंडारा जिल्ह्यातील तीसरी घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT