Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Police : पोलीस अधीक्षक कार्यालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; गोल्ड लोन बँकेने फसवणूक केल्याचा आरोप

Bhandara News : मणप्पुरम गोल्ड लोन बँकेकडून फसवणूक झाल्याच्या कारणातून बँकेत गहाण ठेवलेले सोने किंवा कर्जाची रक्कम मिळावी यासाठी जोशी यांनी टोकाची भूमिका घेत विषारी द्रव्य प्राशन केले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा येथील मणप्पुरम गोल्ड लोन बँकेच्या मॅनेजरने फसवणूक केल्याचा आरोप करीत भंडाऱ्यातील एका इसमाने पोलीस अधीक्षक कार्यालयात येत विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने पोलीस अधीक्षक कार्यालयात खळबळ उडाली असून सदर इसमावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

भंडारा पोलीस अधीक्षक कार्यालयात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली असून यात अमित जोशी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचे नाव आहे. दरम्यान अमित जोशी यांचा मुलगा हिमांशू याने महिनाभरापूर्वी मणप्पुरम गोल्ड लोन बँकेत २९२ ग्रॅम सोनं गहाण ठेवून त्यावर सुमारे १८ लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. मात्र, ज्या कामासाठी त्यांना पैशाची गरज होती, ते काम समोर ढकलल्यानं मणप्पुरम बँकेचा मॅनेजर रोहित साहू यानं जोशी यांच्याकडून ती रक्कम परस्पर फसवणूक करीत स्वतःच्या खात्यावर वळविले आणि भंडारा येथून मॅनेजर साहू हे गायब झालेत. 

बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल 

दरम्यान बँक मॅनेजर साहू यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने अमित जोशी यांना शंका आली. याप्रकरणी अमित जोशी यांनी १८ ऑगस्टला भंडारा पोलिसात तक्रार दाखल करून पोलिसांनी मॅनेजर साहू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भंडारा पोलीस तपास करीत असतानाच अमित जोशी यांना विषप्राशन करण्याचं नाटक करण्याची चिथावणी दिली. 

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

दरम्यान विषप्राशन केल्यास पैसे तातडीनं मिळतील यातून अमित जोशी यांनी आज टोकाची भूमिका घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केलं. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramdas Athawale : सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणे अशक्य; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मोठं विधान

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यातील बैलपोळा सणावर मनोज जरांगे पाटलांची छाप

Viral Video: कंट्रोल सुटला, वाट मिळेल तिथं कंटेनर सुस्साट धावू लागला; महामार्गावरचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

देवेंद्र फडणवीसांनीही मान्य केली व्होट चोरी; जयंत पाटील म्हणाले आमच्यासोबत या |VIDEO

Govinda Sunita Divorce: 'त्याने मला फसवलं, क्रूर वागला...'; गोविंदावर आरोप, पत्नी सुनीता घेणार घटस्फोट?

SCROLL FOR NEXT