Bhandara Crime News x
महाराष्ट्र

Bhandara : धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वडील जाब विचारायला गेले अन् घडलं धक्कादायक कृत्य

Bhandara Crime News : भंडारा जिल्ह्यातील सिहोरा गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार केले.

Yash Shirke

शुभम देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडाऱ्यातील सिहोरा या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचेही म्हटले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. आरोपी फक्त इतक्यावरच थांबला नाही, त्याने या प्रकरणाबद्दल कोणालाही काहीही सांगितल्यास तुझी बदनामी करेन अशी धमकी पीडित मुलीला दिली. मंगेश रहांगडाले (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित तरुणी एकाच गावचे आहेत.

आरोपी मंगेशने पीडित अल्पवयीन मुलीला सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केली, तिच्यावर अत्याचार केले. कोणाला काही सांगितलंस, तर मग तुझी बदनामी करेन असे म्हणत पीडितेला आरोपीने धमकावले. मुलीने घडलेला प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या वडिलांना देखील आरोपीने बदनामीची धमकी दिली.

अत्याचार आणि त्यानंतर धमकावल्यानंतर पीडित मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. फिर्यादींच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी मंगेश रहांगडालेला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT