Bhandara News Saam TV
महाराष्ट्र

भंडारा: लाखांदूर येथे अज्ञात ट्रकच्या धडकेने इसम ठार...

अपघतानंतर अज्ञात ट्रक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी केली आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: पाणी घेऊन रस्त्या ओलांडत असताना अज्ञात ट्रकने जबर धडक दिल्याने एक इसम गंभीर जखम झाला असून त्याला उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील पंचायत समिती समोर घटना घडली आहे. श्रीहरी तुकाराम धोटे वय 45 वर्ष असे मृतक इसमाचे नाव आहे. अपघतानंतर अज्ञात ट्रक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी केली आहे.

साकोली लाखांदूर महामार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोर नगरपंचायतच्या गाळामध्ये रहिवासी असलेला श्रीहरी हा घरी पिण्याचे पाणी आणण्यासाठी महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला घागर घेऊन गेला होता. घागर भरून रस्ता ओलांडून झाल्यानंतर अचानक साकोली कडून लाखांदूरकडे येणाऱ्या अज्ञात ट्रकने श्रीहरी धोटे ला जबर धडक दिली. यात श्रीहरी धोटेच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती परिसरातील लोकांना होताच जखमीला लाखांदूर ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले. मात्र जखमींची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरता हलविण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने नागपूरला नेत असताना वाटेतच श्रीहरी धोटे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच पोलिसांनी घटना स्थळ गाठत पंचनामा करून घटनेची नोंद केली आहे सदर धडक देणाऱ्या त्या ट्रकची शोध मोहीम सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT